शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

परळ टर्मिनससाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात

By admin | Updated: May 17, 2016 05:36 IST

दादर स्थानकावरील लोकलचा वाढता भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर परळ टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव आहे.

मुंबई : दादर स्थानकावरील लोकलचा वाढता भार कमी करण्यासाठी मध्य रेल्वेवर परळ टर्मिनस उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. निविदा प्रक्रिया पूर्ण करताच एका महिन्यात त्याच्या कामाला सुरुवात करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग बांधला जाणार आहे. या मार्गामुळे मेल-एक्स्प्रेस ट्रेनचा मार्ग सुकर होईल आणि रखडणारा लोकल प्रवासही थांबेल. पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रकल्पातच परळ टर्मिनस बांधण्याचाही प्रस्ताव आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी एकूण ८९0 कोटी रुपये खर्च होणार असून, यामध्ये परळ टर्मिनससाठी ८0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सध्या दादर स्थानकमार्गे आणि स्थानकातून मोठ्या प्रमाणात लोकलची ये-जा असते. हा भार कमी करण्यासाठी परळ टर्मिनस उभारले जाणार आहे. या टर्मिनसमधून दादर, सीएसटीप्रमाणेच लोकल सोडण्यात येतील. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले की, परेल टर्मिनसची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. सध्या परळ स्थानकाजवळील एक जादा लाइन मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाकडून रेल्वेच्या बांधकाम विभागाला देण्यात येईल. त्यानंतर ही लाइन तोडली जाईल. त्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. ही लाइन तोडून त्या ठिकाणी परळ टर्मिनसचा नवा प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहे.