शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

हा शेवटचा पराभव - राज ठाकरे

By admin | Updated: March 10, 2017 02:22 IST

महापालिकांचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरले. या पराभवाने निवडणुका कशा लढायच्या याचा धडा मिळाला आहे. यापुढे जिंकण्यासाठी त्यांनी जे-जे

मुंबई : महापालिकांचा निकाल म्हणजे पैसा जिंकला आणि काम हरले. या पराभवाने निवडणुका कशा लढायच्या याचा धडा मिळाला आहे. यापुढे जिंकण्यासाठी त्यांनी जे-जे केले, ते-ते यापुढे मीही करणार, महापालिकेतील पराभव हा आपला शेवटचा पराभव असेल, यापुढे पराभव दिसणार नाही, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना बळ दिले. मनसेच्या ११व्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात राज ठाकरे बोलत होते. महापालिकेतील पराभवानंतर प्रथमच जाहीर सभेत बोलताना राज यांनी या निकालांनी खूपकाही शिकवल्याचे सांगितले. निवडणूक प्रचारात सत्ताधारी पक्ष कोणत्या थराला जाऊन भांडत होते हे सर्वांनी पाहिले आहे. नाशिकमध्ये आम्ही विकासकामे दाखविली तरीही आमचा पराभव झाला. गुंड जिंकले, ज्यांच्याकडे उमेदवार नव्हते अशी भाजपा जिंकली. ज्यांनी मनसेला मतदान केले त्यांना धन्यवाद, पण ज्यांनी नाही केले त्यांनी मला निवडणूक कशी लढवायची हे शिकवले. त्यामुळे आता जिंकलेत त्यांचे फासे मी घेणार, त्यांचे डाव मी खेळणार. यापुढे जे पाहिजे त्याचा पुरवठा होईल, असे राज म्हणाले. आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता. आता मी तुम्हाला भेटायला येईन. माझ्यासहीत मनसेचे नेते तुमच्या भेटीला येतील. हा आपला शेवटचा पराभव असेल. यापुढे पराभव दिसणार नाही. आपण जिंकायचंच. त्यासाठी २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. भाजपा आमदार प्रशांत परिचारक यांनी केलेले वक्तव्य अत्यंत शरमेचे असून, अशांना चौकाचौकांत फोडून काढायला हवे, अशा शब्दांत त्यांनी परिचारकांचा समाचार घेतला. (प्रतिनिधी)- पैसा जिंकला, काम हरले! ही माझी निकालाच्या दिवशीची प्रतिक्रिया होती. ईव्हीएम मशीनबाबत सध्या कानावर येत असलेल्या बाबी खऱ्या असतील तर फारच भयानक प्रकरण आहे. भाजपाचे विजयी झालेले ९० टक्के उमेदवार अजूनही चिमटा घेऊन मिळालेला विजय हे स्वप्न तर नाही ना हे तपासत आहेत, असे राज म्हणाले.