शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

अकरावीच्या प्रवेशाची शेवटची संधी

By admin | Updated: September 26, 2016 02:49 IST

अकरावीत आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी प्रवेशाची अकरावी फेरी सोमवारपासून सुरू होत आहे.

मुंबई : अकरावीत आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी प्रवेशाची अकरावी फेरी सोमवारपासून सुरू होत आहे. आत्तापर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या आणि दहावीच्या फेरपरीक्षेत उत्तीर्ण व एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीसाठी अर्ज करता येईल. मात्र, या आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या फेरीत अर्ज करता येणार नाही.मुंबई विभागाचे शिक्षण उपसंचालक बी.बी.चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत प्रवेशाच्या १० फेऱ्या पार पडल्या आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी आणि प्रवेशात बदल करण्यासाठी पुरेशी संधी देण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपवण्यात येणार आहे. परिणामी, अकरावी आॅनलाइन प्रवेशाची ही शेवटची संधी असेल. आत्तापर्यंत कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच या वेळी अर्ज करता येईल. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आॅफलाइन प्रवेशास बंदी असल्याने, प्रवेश फेऱ्यांची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळेच यापुढे प्रवेशापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची जबाबदारी कार्यालयाची राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना या फेरीत सामील होण्यासाठी २६ व २७ सप्टेंबरदरम्यान प्रवेश अर्ज व पसंतीक्रम अर्ज भरून निश्चित करावा लागेल. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. गुणवत्ता यादीत ज्या विद्यार्थ्यांची नावे घोषित होतील, त्यांना संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात २९ सप्टेंबर रोजी प्रवेश निश्चित करणे बंधनकारक असेल. या फेरीनंतर कोणतीही प्रवेश फेरी होणार नसल्याचे पालक, विद्यार्थी, प्राचार्य आणि मुख्याध्यापकांनी लक्षात घ्यावे, असे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले आहे. (प्रतिनिधी)