शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी जमिनीचा प्रस्ताव धूळ खात

By admin | Updated: September 20, 2014 00:39 IST

अकोल्यातील उपकेंद्र उभारणीचे घोंगडे भिजतच

संतोष येलकर/अकोला विदर्भ-मराठवाडयातील शेतकर्‍यांना निवासी प्रशिक्षण आणि युवकांसाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथे उभारण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा प्रस्ताव मात्र गत अडिच वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडून आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेतकर्‍यांना कृषीवर आधारित निवासी प्रशिक्षण देणे, महिला शेतकर्‍यांना गुहउद्योगाचे प्रशिक्षण आणि शेतक-यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानासोबतच कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरु करण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सोयीस्कर ठरणार्‍या अकोला जिल्ह्यात मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करण्याचा प्रस्ताव करण्यात आला होता. त्यासाठी अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथे आवश्यक शासकीय जमिन मागणीचा प्रस्ताव मुक्त विद्यापीठाच्या अमरावती येथील विभागीय संचालकांमार्फत २0१२ मध्ये अकोला जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करण्यात आला. तसेच चिखलगाव येथील संबंधित जमिनीचे मोजमाप भूमि अभिलेख विभागामार्फत करण्यात आले. त्यानंतर १७.0२ हेक्टर जमिनीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १0 फेब्रुवारी २0१२ रोजी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. अडिच वर्षांपासून या प्रस्तावाचा प्रवास सुरू आहे; मात्र अद्यापही त्याला शासनाकडून मान्यता मिळाली नाही. मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथील १७.0२ हेक्टर जमिन मागणीबाबतचा प्रस्ताव १0 फेब्रुवारी २0१२ रोजी विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून आयुक्तांमार्फत तो शासनाकडे पाठविण्यात आला आहे. आता शासनाच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रमोद देशमुख यांनी सांगीतले तर विदर्भ आणि मराठवाड्यासाठी सोयीस्कर ठरणा-या उपकेंद्रासाठी जमिन मागणीच्या प्रस्तावाला तात्काळ मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे मत मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. अनिरुध्द जायले यांनी नोंदविले. **विदर्भ आणि मराठवाड्याला होणार लाभ!मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र अकोला जिल्ह्यात सुरु झाल्यास, त्याचा लाभ विदर्भासह मराठवाड्यातील शेतकरी आणि सुशिक्षीत बेरोजगार युवकांना होईल. या उपकेंद्राव्दारे विदर्भ व मराठवाड्यातील शे तकर्‍यांना कृषीवर आधारित प्रशिक्षण तसेच शेतीपुरक उद्योगांचे प्रशिक्षण आणि माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमही तयार करण्यात येणार असून, त्याव्दारे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.