शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सातबारावरून जमीन झाली गायब

By admin | Updated: September 20, 2016 01:51 IST

नर्मदाबाई अर्जुन शेळके या महिला शेतकऱ्याने सन १९९४ ते १९९८ साली घेतलेली पाच एकर शेतजमीनच सातबाऱ्यावरून गायब झाली आहे.

बारामती : तालुक्यातील सुपानजीक पानसरेवाडी येथे नर्मदाबाई अर्जुन शेळके या महिला शेतकऱ्याने सन १९९४ ते १९९८ साली घेतलेली पाच एकर शेतजमीनच सातबाऱ्यावरून गायब झाली आहे. यामुळे तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला आहे. याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तालुक्यातील सुपानजीक पानसरेवाडी येथील नर्मदाबाई शेळके यांनी १८ जुलै १९९४ साली गट क्र. ९०२ मधील ८० आर तसेच त्याच गटातून भगवान नानासाहेब शेळके यांनी ८० आर क्षेत्र खरेदी केले होते. त्यानंतर ६ जुलै १९९८ रोजी ४० आर शेतजमीन गुलाबराव पानसरे यांच्याकडून नर्मदाबाई यांनी खरेदीखताने विकत घेतली होती. खरेदी केल्यापासून शेळके हे शेतजमीन वहिवाटत होते. तसेच अजितदादा विविध कार्यकारी सोसायटीकडून ते नियमित कर्जही काढत होते. मात्र, खरीप हंगामातील पीककर्ज काढण्यासाठी ते सातबारा आणण्यासाठी सुपा येथे गेले असता त्यांचे नाव सातबाऱ्यातून गायब झाले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे त्यांची जमीनच गायब झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. जमीन विकत देणाऱ्या पानसरे कुटुंबीयातील दत्तात्रय पानसरे व वसंत पानसरे यांचा जमीनवाटपाचा दावा न्यायालयात दाखल केला होता. याबाबत शेळके अनभिज्ञ होते. येथील जमिनीचे भाव गगनाला भिडलेले असल्याने याचा पानसरे यांनी फायदा उचलत तहसीलदार, भूमी अभिलेख, मंडल अधिकारी व तलाठी यांना हाताशी धरून आपणावर अन्याय केला असल्याचा आरोप नर्मदा शेळके यांनी केला. (वार्ताहर)पानसरे दोन्ही भावांमध्ये गेल्या २० वर्षांपासून जमीनवाटपावरून कोर्टात वाद सुरू होता. दरम्यानच्या काळात दोघांनी गट क्र. ९०२ मधील जमिनीची विक्री केली आहे. मात्र, न्यायालयाच्या अंतिम निर्णयावेळेस सुधारित सातबारा न दिल्याने नर्मदा शेळके यांचे नाव कमी झाले आहे. नायब तहसीलदारांनी जमीनवाटप केले आहे. मी केवळ सातबाऱ्यावर इफेक्ट दिला आहे.- आर. आर. जगदाळे, तलाठी, सुपे