शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

फकिराघरचे लक्ष्मीपूजन!

By admin | Updated: November 12, 2015 23:57 IST

आयुष्यभर फकिराचं जीवन जगलेल्या साईबाबा संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे

प्रमोद आहेर, शिर्डी आयुष्यभर फकिराचं जीवन जगलेल्या साईबाबा संस्थानची झोळी जगभरातील लाखो भाविकांच्या दातृत्वामुळे भरली आहे.शिर्डीतील फकिराच्या घरी साक्षात लक्ष्मीची पावलं उमटल्यामुळे बाबांच्या नावाने सुरू करण्यात आलेले संस्थानही करोडपती बनले आहे़येथील धनलक्ष्मीची बुधवारी प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली़ बाबांच्या मूर्तीवर दीड कोटींच्या हिरेजडीत सुवर्ण मुकूटासह कोट्यवधींची आभूषणे घालण्यात आली होती़ संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी लक्ष्मीपूजन केले.शिर्डी देवस्थान आज करोडपती बनले आहे़ संस्थानची स्थापना झाल्यावर २८ मे १९२३ रोजी संस्थानने काही तुटलेली तांब्या, पितळेची भांडी व चांदीच्या दोन ताटल्या मोडून बाबांच्या आरतीसाठी तबक बनवले होते़ आज मात्र बाबांचे सिंहासन व मंदिराच्या शिखरासह रोजच्या पूजेतील वापराच्या जवळपास सर्वच वस्तू सोन्याच्या आहेत़गेल्या ९२ वर्षांतील संस्थानचा ताळेबंद आश्चर्यकारक आहे़ १९२३ साली संस्थानचे इंपेरियल बँकेच्या बचत खात्यात केवळ १,४४५ रुपये ७ आणे व ६ पैसे होते़ आज पंधरा राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे १,४८३ कोटी रुपये ठेवीच्या स्वरुपात आहेत़ यंदा ठेवींवर संस्थानला निव्वळ व्याजापोटी ९९ कोटी रुपये मिळाले़ संस्थानची सध्याची स्थावर मालमत्ता पाचशे कोटींवर आहे़ याशिवाय वापरातील सोन्यासह जवळपास ३८० किलो सोने व चार हजार किलो चांदी आणि सात कोटींची हिरेमाणके तिजोरीत आहेत़भाविकांच्या दानातून येथे अल्पदरात अन्नछत्र चालवले जाते़ शाळा, रुग्णालये, नागरी सुविधा व शासनालाही मदत याच फकिराच्या झोळीतून करण्यात येते़ बाबांची झोळी ऐश्वर्यसंपन्न बनली असली तरी समाधी शताब्दीच्या उंबरठ्यावर मंदावलेली विकासकामे, भाविकांची रोडावलेली संख्या व शहराचे बिघडलेले अर्थकारण चिंतेची बाब आहे़