शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

लेडी चिटर हॉटेलमधून पोहोचली थेट तुरुंगात

By admin | Updated: October 21, 2016 22:44 IST

बोगस ओळखपत्राच्या मदतीने एक तरुणी महिनाभरापासून रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे थांबून होती

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २१ : बोगस ओळखपत्राच्या मदतीने एक तरुणी महिनाभरापासून रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे थांबून होती. वारंवार तकादा लावूनही ती खोलीचे भाडे जमा करण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने हॉटेल व्यवस्थापनाला तिच्यावर संशय आला. व्यवस्थापनाने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांचच्या सक्रियतेने तिचे पितळ उघले पडले.

पूजा ठक्कर ऊर्फ पूजा खान (२७) रा. जुहू मुंबई असे आरोपी तरुणीचे नाव आहे. पूजा २३ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे आली. तिने स्वत:ची ओळख इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ ज्युरीचे सदस्य असल्याचे करून दिली. स्वत:चे ओळखपत्र दाखवून हॉटेलमध्ये खोली बुक केली. हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी नियमानुसार पूजाकडून ह्यअ‍ॅडव्हान्सह्णसुद्धा घेतला नाही. पूजा ही विधी सेवेची अधिकारी असल्याचे हॉटेलच्या अधिकाऱ्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी तिच्यावर ह्यअ‍ॅडव्हान्सह्णसाठी दबाव टाकणे योग्य समजले नाही. याच दरम्यान पूजा पुण्याला गेली. तेथून परत आल्यावर हॉटेलच्या व्यवस्थापकांनी तिला हॉटेलचे बिल भरण्यास सांगितले. तेव्हा हॉटेलच्या खात्यात आॅनलाईन रक्कम जमा करण्यात आल्याचे पूजाने सांगितले. परंतु नंतर रक्कम जमा झाली नसल्याचे लक्षात आल्यावर हॉटेल व्यवस्थापकांनी तिला पुन्हा पैसे भरण्यास सांगितले. वारंवार तकादा लावूनही पूजा पैसे भरण्यास टाळाटाळ करू लागली.

पूजाचे प्रभावशाली व्यक्तित्त्व आणि वाक्पटुतेमुळे हॉटेलचे अधिकारी तिला सामना करू शकत नव्हते. पूजा पैसे भरत नसल्याने तिला हॉटेल खाली करण्यास सांगण्यात आले. तेव्हा पूजा आणखीनच संतापली. तिने हॉटेल व्यवस्थापकांना गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली. प्रशासनात आणि पोलीस विभागातील अनेक अधिकाऱ्यांशी आपली ओळख असल्याचे सांगत तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली. या दरम्यान हॉटेलच्या अधिकाऱ्यांनी पूजाची माहिती काढण्यास सुरुवात केली तेव्हा पूजाचा खरा चेहरा उघडकीस आला. पूजाचे ओळखपत्र बोगस असल्याचे आढळून आले. खूप शोध घेतल्यानंतर पूजाविरुद्ध उत्तराखंडमधील मसुरी आणि मुंबईत फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची बाब उघडकीस आली. मुंबईत ती सीबीआय अअधिकारी म्हणून लाल दिव्याच्या गाडीत फिरत होती.

लंडनमधून केले एलएलबी पूजाने आपल्या बायोडाटामध्ये लंडनमधून एलएलबीची डिग्री घेतल्याचा उल्लेख केला आहे. तिने हॉवर्ड विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. ती स्वत:ला महाराष्ट्र पोलिसांचे कायदेशीर सल्लागार, सायबर विशेषज्ज्ञ आणि विधी विभागासाठी काम करीत असल्याचे सांगत आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करीत असल्याचे सांगत आहे. तिची विचारपूस करताना आपल्या वाक्पटुतेने तिने सीताबर्डी पोलिसांची बोलती बंद केली. झोन दोनचे डीसीपी आर. कलासागर यांनी तिची विचारपूस केली असता त्यांचीही तिने दिशाभूल केली. ती आपल्या आई-वडिलांबाबत काहीही सांगत नाही.

 

आयपीएसशी झाले लग्न सूत्रानुसार नीलेश ठक्कर याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर पूजाने जुलै महिन्यात एका सेवानिवृत्त आयपीएसशी लग्न केले आहे. त्यामुळे ती पूजा खान म्हणून सुद्धा स्वत:ची ओळख सांगते. लग्नाच्या दोन महिन्यानंतरच ती पतीपासून वेगळी राहत आहे. यासंदर्भात विचारणा केली असता ती काहीही सांगत नाही. हॉटेलमध्ये स्पा चालवणाऱ्या महिलेकडूनही पूजाने मोठ्या प्रमाणात वस्तू खरेदी केल्या आहेत. तससेच टॅक्सीचालकाचेही बिल शिल्लक असल्याचे सांगितले जाते.