शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

महिला कार रॅली ठरली लक्षवेधी

By admin | Updated: March 7, 2017 02:05 IST

महिला सबलीकरणाचा संदेश देत मुंबईत रविवारी अनोखी महिला कार रॅली पार पडली.

मुंबई : महिला सबलीकरणाचा संदेश देत मुंबईत रविवारी अनोखी महिला कार रॅली पार पडली. अंधेरी ते अ‍ॅम्बी व्हॅलीपर्यंत काढण्यात आलेल्या या विशेष रॅलीचे आयोजन ८ मार्च रोजी होणाऱ्या महिला दिनानिमित्त करण्यात आले होते. या रॅलीमध्ये मुंबईतील १८ ते ७५ वर्षांपर्यंतच्या हौशी महिला ड्रायव्हर्सनी सहभाग घेत समाजामध्ये महिला सबलीकरणाचा संदेश दिला. वेस्टर्न इंडिया आॅटोमोबाइल असोसिएशनच्या (डब्ल्यूआयएए) वतीने झालेल्या या रॅलीला मुंबई विमानतळाजवळील एका नामांकित हॉटेलपासून सकाळी ७ च्या सुमारास सुरुवात झाली. या वेळी रॅलीत सुमारे ८०० कार सहभागी झाल्या होत्या आणि प्रत्येक कार विशेषरीत्या सजविण्यात आल्याने महिला कार रॅलीने मुंबईकरांचे लक्ष वेधले. या वेळी रॅलीच्या मार्गक्रमणात नागरिकांमध्ये या रॅलीची क्षणचित्रे आपल्या मोबाइलमध्ये घेण्यासाठी मोठी चढाओढ लागली. वरळी सी-फेस, पेडर रोड, चौपाटी, मरिन ड्राइव्ह, चर्चगेट अशा मार्गाने गेलेली ही रॅली लोणावळा अ‍ॅम्बी व्हॅली येथे समाप्त झाली. सोशल मीडियावर अनेकदा महिला चालकांवर विनोद तयार करून त्यांचे मानसिक खच्चीकरण केले जाते. परंतु, महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून, ड्रायव्हिंगसारख्या पुरुषी क्षेत्रातही आम्ही आमचे वेगळे स्थान निर्माण करू शकतो, असा संदेश देत मुंबईतील महिलांनी हा उपक्रम यशस्वी केला. (प्रतिनिधी)