शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

पाणीप्रश्नी पर्यायी व्यवस्थेची बेफिकिरी

By admin | Updated: July 1, 2016 01:35 IST

जून संपत आला तरी पावसाचे आगमन होईना, दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत चालला आहे.

पुणे : जून संपत आला तरी पावसाचे आगमन होईना, दुसरीकडे धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत चालला आहे. अवघे २४ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा धरणांमध्ये शिल्लक राहिला आहे. त्यावेळी पाणी उपलब्धतेच्या पर्यायी व्यवस्था करून ठेवण्याची जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर असताना ते पूर्ण बेफिकीर दिसून येत आहेत. आयुक्त, महापौरांनी विहिरींची स्वच्छता करण्याचे आदेश देऊनही त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असणारे अनेक स्रोत शहरात असताना त्याबाबतही प्रशासन पूर्ण अनभिज्ञ असल्याचे चित्र आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणांमध्ये एकूण १.४८ टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. महापौर प्रशांत जगताप यांनी नुकतीच या धरणांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सध्या रमजानचा सण असल्याने ७ जुलैपर्यंत कोणतीही वाढीव पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महापौरांनी प्रशासनाला विहिरींची स्वच्छता करणे, बोअरवेल, पाण्याचे मोठे स्रोत असलेल्या झरे आदींची माहिती गोळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रशासनाकडून त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही.शहरामध्ये ३०० विहिरी आहेत, त्या विहिरीत पाण्याची स्वच्छता करून तिथे टँकर भरण्याची व्यवस्था करता येऊ शकेल. विहिरीतील हे पाणी पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी उपयोग आणता येणे सहज शक्य आहे. शहरामध्ये इमारतींचे बांधकाम करताना अचानक पाण्याचे मोठे झरे आढळून आले आहेत. या झऱ्यांमधील पाणी ड्रेनेजमध्ये टाकले जात आहे किंवा ते झरे बुजविण्यात आले आहेत, अशा ठिकाणांचा शोध घेतला जाणे आवश्यक आहे. शहराला सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेची आहे. केवळ पाटबंधारे विभाग किती पाणी सोडेल या आशेवर अवलंबून राहण्याची भूमिका पाणीपुरवठा विभागाला घेता येणार नाही. शहरामध्ये सप्टेंबर महिन्यापासून पाणीकपात लागू करून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्याच वेळी पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त कुणाल कुमार यांनी दिली. >शहराला एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे, त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र शहरातील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जादा दाबाने व पूर्वीपेक्षा जास्त वेळ पाणी येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.शहरात मोतीबाग व टिळक रोड येथे पाण्याचे दोन मोठे स्रोत लागले आहेत. मोतीबाग येथून दररोज १० ते १२ टँकर पाणी उचलून ते बागेसाठी वापरले जात आहे, प्रत्यक्षात येथून दररोज २० ते २५ टँकर पाणी उपलब्ध होऊ शकते. मात्र या पाण्याला फारशी मागणी नसल्याने दहा ते बारा टँकरच पाणी उचलले जात आहे. विहिरीतील पाण्याची अद्याप स्वच्छता केलेली नाही.’’- व्ही. जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख