शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

इतिहासातील कुंभमेळे !

By admin | Updated: July 12, 2015 02:23 IST

कुंभमेळ््याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली याचा उल्लेख कुठेही नाही. विष्णुपुराण, रामायण, महाभारत, मत्स्यपुराण या पुराणग्रंथांमध्ये कुंभस्नानाचे महत्त्व नमूद आहे.

इतिहासातील कुंभमेळे !कुंभमेळ््याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली याचा उल्लेख कुठेही नाही. विष्णुपुराण, रामायण, महाभारत, मत्स्यपुराण या पुराणग्रंथांमध्ये कुंभस्नानाचे महत्त्व नमूद आहे. प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्यू एन त्संग हा सातव्या शतकात भारतात आला होता. त्यावेळी तो हरिद्वार आणि अलाहाबाद कुंभमेळ््याला उपस्थित राहिला होता. त्याने कनोजचा चक्रवर्ती सम्राट हर्षवर्धन याचा कुंभमेळ््यातील सहभाग पाहिला. या काळात इ.स. ६१२ मध्ये सातव्या शतकातले प्रथम महाकुंभपर्व अलाहाबादला पार पडले होते. कुंभमेळ््यातील श्रद्धेचे वर्णन करताना ह्यू एन त्संग म्हणतो, ‘दोन नद्यांच्या संगमात स्नान केल्याने पाप धुतले जाते, तर कुंभपर्वात नदीला प्राण अर्पण केल्याने माणूस सरळ स्वर्गात जन्म घेतो, अशी यात्रेकरूंची श्रद्धा होती.’ इ.स. १३३८ साली हरिद्वारला भरलेल्या कुंभमेळ््यात गंगास्नान करणाऱ्या यात्रेकरूंची तैमूरलिंगने अमानुषपणे कत्तल केली. त्यावेळी सहिष्णू स्वभावाच्या अहिंसक साधूंनाही हाती शस्त्र घेत तैमूरलिंगसोबत सामना करावा लागला. तेव्हापासून नागा साधूंमध्ये शस्त्रधारी आणि शास्त्रधारी असे दोन विभाग निर्माण झाले. अकबराच्या काळात पुन्हा कुंभमहोत्सवाला हिंदू आणि बौद्धधर्मीय यात्रेकरू मोठ्या संख्येने जमू लागले. अकबराने महामंत्री राजा जयसिंह याच्या मार्गदर्शनानुसार हरिद्वारमध्ये कुंभमेळ््यासाठी अनेक सुविधा निर्माण केल्या. इ.स. १६३0 सालच्या हरिद्वारच्या कुंभपर्वात बादशहा जहांगीर स्वत: उपस्थित राहिला होता. त्याने तेथे मोठा दानधर्म केल्याचा उल्लेख जहांगीरनामामध्ये आहे. इंग्रजकाळातही कुंभपरंपरेत खंड पडला नाही. उलट त्यांनी हरिद्वारसारख्या ठिकाणी अनेक सुधारणा केल्या. दीडशे वर्षांपूर्वी अलाहाबाद कुंभमेळ््याबाबत जे. सी. डेव्हिडसन याने १८४३ साली प्रकाशित केलेल्या ‘डायरी आॅफ ए ट्राइबल इन अपर इंडिया’ या पुस्तकात सविस्तर वर्णन केले आहे. दुसऱ्या महायुद्वाच्या काळात इंग्रज सरकारने हरिद्वारच्या कुंभमेळ््यावर प्रथमच बंदी आणली होती. त्यावेळी साधू कमालीचे संतप्त झाले होते. शेवटी जनमतापुढे इंग्रज सरकारला नमते घ्यावे लागले होते. कुंभमेळ््याचा सोहळा पाहण्यासाठी महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राधाकृष्णन, राजेंद्र प्रसाद, नेताजी सुभाषचंद्र बोस या थोर नेत्यांनीही उपस्थिती लावली आहे.तंटेबखेडे, चेंगराचेंगरीकुंभपर्वात प्रथम स्नान करण्याच्या मानापमानावरून विविध पंथांच्या साधूंमध्ये अनेकदा संघर्ष उडाला आहे. 10/04/1760 रोजी बैरागी व गोसावींमध्ये झालेल्या संघर्षात २ हजार साधू आणि यात्रेकरू मृत्यूमुखी पडले होते. 1765 मध्ये गोसावी आणि निर्मल आखाड्यामध्ये झालेल्या वादात पाचशे गोसावी व साधू मारले गेले होते. १८७६ सालीही अशाच प्रकारे शेकडो साधू मारले होते.1926 साली भीमगौडाजवळचा पूल तुटून अनेक यात्रेकरू व साधू दगावले. १९३८ साली हरिद्वारला आग लागून अनेक यात्रेकरू मरण पावले. पूर्वीच्या काळात गंगाकिनारी असलेले ब्रम्हकुंड अतिशय अरुंद होते. 1820साली ब्रम्हकुंडावर स्रानासाठी जमलेल्या गर्दीत ४३0 यात्रेकरू चेंगरून मरण पावले तर १८६७ ला साथ पसरल्याने अनेक यात्रेकरू व साधू मृत्युमुखी पडले. 1950साली हरकी पौडी घाटावरील गर्दीत अनेक यात्रेकरू चेंगरून मेले. १९६८ साली अशाच प्रकारे कुशावर्त घाटावर चेंगराचेंगरी झाली.