शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
3
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
4
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
5
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
6
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
7
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
8
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
9
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
10
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
11
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
12
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
13
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
14
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
15
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

कोकण रेल्वे पूर्ण दिवस ‘ब्लॉक’

By admin | Updated: May 15, 2014 04:22 IST

मध्य रेल्वेने पेणजवळ काही कामांसाठी घेतलेल्या ब्लॉकची वेळ अचानक वाढवल्याने त्याचा मोठा फटका कोकण रेल्वेला बसला.

मंबई : मध्य रेल्वेने पेणजवळ काही कामांसाठी घेतलेल्या ब्लॉकची वेळ अचानक वाढवल्याने त्याचा मोठा फटका कोकण रेल्वेला बसला. कोकण रेल्वे मार्गावरुन सीएसटीच्या दिशेने येणार्‍या अनेक एक्सप्रेस गाड्यांना जागीच थांबवण्यात आल्या. तब्बल तीन ते चार तास एक्सप्रेस गाड्यांना थांबवण्यात आल्याने प्रवाशांकडून मात्र संताप व्यक्त करण्यात आल्या. काम वेळेत पूर्ण न झाल्यानेच हा फटका बसल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेने पेणच्या रेल्वे स्टेशन यार्डाचे आणि इंटर लॉकिंग कनेक्शनचे काम हाती घेतले आहे. ११ मे आणि १३ मे रोजी हे काम पूर्ण न झाल्याने १४ मे रोजीही दुपारी १२.४0 ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला. मात्र काम वेळेत पूर्ण न झाल्याने मध्य रेल्वेने चार वाजेपर्यंत असणारा ब्लॉक संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाढवला. पाच वाजेपर्यंतही काम पूर्ण न झाल्याने अखेर रात्री सात वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेऊन काम करण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचाच मोठा फटका हळूहळू कोकण रेल्वे मार्गावरुन सीएसटीच्या दिशेने येणार्‍या एक्सप्रेस गाड्यांना बसला. ५0१0६ सावंतवाडी-दिवा ट्रेनला कोलाडजवळ तब्बल तीन तास थांबवून ठेवण्यात आले. त्यानंतर १0१0४ मांडवी एक्सप्रेसला कोलाडजवळच १ तास १0 मिनिटे आणि १२४४९ गोवा संपर्क क्रांति एक्स्प्रेसला माणगावजवळ दोन तास आणि पुन्हा कोलाडजवळ एक तास थांबवण्यात आले. तसेच १६३३६ हापा एक्सप्रेसला वीर स्थानकात दोन तास आणि 0१00४ हॉलिडे स्पेशल ट्रेनलाही संध्याकाळी कोलाडजवळच दोन तास थांबवण्यात आल्याचे कोकण रेल्वेकडून सांगण्यात आले.