शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
4
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
5
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
6
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
7
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
9
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
10
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
11
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
12
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
13
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
14
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
16
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
17
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
18
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
19
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
20
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
Daily Top 2Weekly Top 5

मराठी नाट्यसंमेलनासाठी कोंडदेव स्टेडियम मिळणे अशक्य!

By admin | Updated: November 26, 2015 03:08 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमासाठी ठाण्यातील एकमेव असलेले दादोजी कोंडदेव स्टेडियम उपलब्ध होणार नाही,

भाग्यश्री प्रधान,  ठाणेअखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमासाठी ठाण्यातील एकमेव असलेले दादोजी कोंडदेव स्टेडियम उपलब्ध होणार नाही, असे संकेत प्राप्त होत आहेत. ठाण्यात झालेल्या साहित्य संमेलनाच्यावेळी या स्टेडियमची हानी झाल्यामुळे खेळाखेरीज अन्य कुठल्याही कारणासाठी ते उपलब्ध करून द्यायचे नाही असा नियम तत्कालीन आयुक्तांनी केला आहे. त्यामुळे आता ठाणे महापालिका नियम धाब्यावर बसवून स्टेडियम नाट्य संमेलानकरीता उपलब्ध करून देणार का, असा सवाल निर्माण झाला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांच्या ‘समन्वय प्रतिष्ठान’ने डिसेंबरमध्ये आयोजित केलेल्या ‘वसंत बाल महोत्सवा’ला महापालिकेने दादोजी कोंडदेव स्टेडियम दिले आहे. डावखरे यांच्यासाठी स्टेडियम उपलब्ध झाले तर दोन महिन्यांनी होणाऱ्या नाट्य संमेलनासाठीही ते उपलब्ध होईल व त्याकरिता शिवसेनेचे खासदार आणि संमेलनाचे आयोजक राजन विचारे हे पुढाकार घेतील, असा विश्वास नाट्यकर्मींना वाटत आहे. ठाणे शहरात यापूर्वी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्यावेळी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर उभारलेल्या मंडपामुळे मैदान उखडले गेले होते. त्यानंतर महापालिकेने ते जैसे थे केले. परंतु सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे खेळांडूंच्या सरावात अडथळे येतात हे लक्षात आल्याने तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव यांनी कोंडदेव स्टेडियम फक्त खेळासाठीच वापरण्यात येईल, असा ठराव महासभेत मंजूर करून घेतला. त्यानंतर या स्टेडियमवर कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम झाले नाहीत. डावखरे यांच्या ‘वसंत बाल महोत्सवाला’ही यापूर्वी परवानगी नाकारण्यात आली होती. मात्र यावेळी ती दिली गेली.यंदाचा ‘वसंत बाल महोत्सव’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही. त्यात खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळेच महापालिकेने हा कार्यक्रम स्टेडियमवर करण्यास परवानगी दिली आहे.- निलिमा निरंजन डावखरे, आयोजक, वसंत बाल महोत्सवठाणे महापालिकेच्या महासभेत नाट्य संमेलनाला कोंडदेव स्टेडियम देण्याचा ठराव मंजूर करवून घेतला तर हे स्टेडियम संमेलनास देण्यात अडसर येणार नाही. संमेलनाचे आयोजक तसा निश्चित प्रयत्न करतील.- विद्याधर ठाणेकर, अ. भा. मराठी नाट्य परिषदेचे सदस्य, ठाणे