शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर टोलमुक्त करणारच

By admin | Updated: November 22, 2014 03:09 IST

टोलसह एलबीटीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आम्ही टोलमुक्तीची घोषणा केली आहे. त्याच्याशी आम्ही निश्चित बांधील आहोत.

कोल्हापूर : टोलसह एलबीटीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आम्ही टोलमुक्तीची घोषणा केली आहे. त्याच्याशी आम्ही निश्चित बांधील आहोत. थोडा वेळ द्या, कोणत्याही परिस्थितीत आम्ही कोल्हापूर टोलमुक्त करणारच, अशी ग्वाही सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी कोल्हापुरात दिली. तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. शासकीय विश्रामगृह येथे नागरिकांशी संवाद साधल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.गुरुवारी येथील टोलनाक्यावर महिलांनी आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर टोल या विषयात सरकारने माघार घेतलेली नाही. सायन-पनवेल येथील २ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पातील टोल आकारणी रद्द करण्याबाबत सरकारचा विचार सुरू आहे. त्या तुलनेत कोल्हापूर प्रकल्पाचा प्रश्न छोटा आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबतही सकारात्मक निर्णय घेऊन टोल रद्द करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या सरकारची स्थिती थोडी अस्थिर आहे. दररोज सरकारकडून घेतले जात असलेले तातडीचे निर्णय आणि सरकार स्थिर करण्यासाठी होत असलेले प्रयत्न यामुळे सरकारची धावपळ होत आहे. तरीही यासंदर्भात महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळासोबत दोनदा बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा झाली आहे. परंतु पाच वर्षांत सुटू शकला नाही तो प्रश्न एकाच रात्रीत कसा सुटू शकेल? यासाठी वेळ लागणार आहे. एलबीटीबाबत मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास करण्यात आला आहे. जीएसटी आल्यावर आम्ही एलबीटी आणि जकात पूर्ण संपवू. व्यापाऱ्यांनी हा कर व्हॅटवर सरचार्ज आकारण्याचा पर्याय दिला आहे. त्यानुसार हा कर व्हॅटमध्ये जोडता येईल का, याबाबत सरकार विचार करीत आहे. एलबीटी कमी जमा झाला तर अडचण होईल, तसेच त्याला पर्यायही दिला नाहीतर तेही चालू शकणार नाही. (प्रतिनिधी)