शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात काँग्रेसला तीन

By admin | Updated: March 15, 2017 00:24 IST

जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांच्या सभापती निवडीत कॉँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे तीन सभापती झाले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन ठिकाणी

कोल्हापूर : जिल्ह्यातील बारा पंचायत समित्यांच्या सभापती निवडीत कॉँग्रेसचे सर्वाधिक म्हणजे तीन सभापती झाले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेला प्रत्येकी दोन ठिकाणी, तर स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनसुराज्य आणि स्थानिक शाहू आघाडीला प्रत्येकी एका ठिकाणी सभापती बनविण्याची संधी मिळाली आहे. गेल्या दोन दिवसांत प्रचंड राजकीय उलथापालथी होत जिल्ह्यातील राजकारणामध्ये काहीही होऊ शकते, याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले. चक्क राष्ट्रवादी आणि भाजपने एकत्र येत गडहिंग्लजमध्ये सत्ता स्थापन करताना दुसरीकडे भाजप, स्वाभिमानी आणि कॉँग्रेस यांनी एकत्र येत ‘स्वाभिमानी’चा केवळ एकच सदस्य असताना, त्यालाच सभापती करण्याची ‘राजकीय दानशूरता’ही चंदगड येथे दाखविण्यात आली आहे! कागलमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय मंडलिक यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने शिवसेनेच्या कमल पाटील या सभापती, तर राष्ट्रवादीचे रमेश तोडकर बिनविरोध उपसभापती बनले.शिरोळमध्ये दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेची युती होऊन तेथे कॉँग्रेसचे मल्लाप्पा चौगुले यांची सभापतिपदी व उपसभापतिपदी शिवसेनेच्या कविता चौगुले यांची निवड झाली. गडहिंग्लजमध्ये अनपेक्षितपणे राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आल्याने भाजपच्या जयश्री तेली यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादीच्या बानश्री चौगुले यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. चंदगडमध्ये मात्र नाट्यमय घडामोडी घडल्या असून येथे स्वाभिमानीचे एकमेव सदस्य असलेले जगन्नाथ हुलजी हे सभापती झाले आहेत.