शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोकाकोला, रिफायनरीत हजारोंना रोजगार!

By admin | Updated: July 2, 2015 00:28 IST

रत्नागिरी : भविष्यात येणाऱ्या अनेक उद्योगांमुळे जिल्हा बनणार उद्योगनगरी...

रत्नागिरी : जिल्ह्यात येत्या काही वर्षात अनेक मोठे उद्योग येणार आहेत. गुहागरमध्ये रिफायनरी, हर्मन फिनोकेम, हिंदुस्थान पेपर कार्पाेरेशनसारख्या कंपन्या जिल्ह्यात येणार असतानाच आता कोकाकोलाचा ५०० कोटींचा प्रकल्प जिल्ह्यातील लोटे-परशुराम वसाहतीत उभारला जाणार आहे. त्याबाबतच्या करारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिका भेटीत स्वाक्षरीही केली आहे. जिल्ह्यात येणाऱ्या या उद्योगांचे स्वागत नक्कीच होईल, परंतु या उद्योगांमध्ये स्थानिकांना नोकऱ्या उपलब्ध होणे आवश्यक असूून, त्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाणारे बेरोजगारांचे लोंढे कमी होण्यास मदत होईल, अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. लोटे येथे होणाऱ्या कोकाकोलाच्या प्रकल्पासाठी अनेक गोष्टी पूरक ठरणाऱ्या आहेत. या ठिकाणी कोयनेचे अवजल आहे. कोकण रेल्वे मार्ग जवळ आहे. आवश्यकतेनुसार दापोली व गुहागर बंदरांचा वापर करणेही शक्य आहे. चिपळूण रेल्वेस्थानकही प्रकल्पस्थळापासून जवळ असल्याने कन्याकुमारीपर्यंत वाहतूक करणे कमी खर्चाचे व सहज शक्य होणारे आहे. या पार्श्वभूमीवर कोकाकोलाचा प्रकल्प येथे उभारला जाणार हे आता निश्चित झाले आहे. कोकाकोलाप्रमाणेच जिल्ह्यात गुहागर तवसाळ येथे बीपीसीएल व इंडियन आॅईल कंपन्यांमार्फत संयुुक्तपणे रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पाचे दोन टप्पे असून, दोन्ही टप्पे प्रत्येकी २२ हजार कोटींचे आहेत. त्यामुळे खूप मोठी गुंतवणूक जिल्ह्यात या उद्योगाच्या रुपाने होणार आहे. प्रकल्पाचे काम ३ ते ४ वर्षे चालणार आहे. त्यामुळे प्रकल्प उभारणी सुरू असताना येथे १५ ते २० हजार कर्मचारी लागणार आहेत. प्रकल्पाच्या पूर्ततेनंतर ५ हजार कायम कामगार लागणार आहेत. येणाऱ्या या व अन्य प्रकल्पांतील कामगारांची, रोजगाराची क्षमता मोठी आहे. त्यातील किमान ५० टक्के रोजगार हा प्रकल्पग्रस्त व जिल्ह्यातील बेरोेजगारांना मिळाला पाहिजे, यासाठी आतापासूनच येथील संस्थांनी, राजकीय नेत्यांनी आवश्यक रणनीती आखून बेरोजगारांना रोजगार कसा मिळेल, यासाठी सतर्क राहिले पाहिजे. (प्रतिनिधी)कोकाकोलाचा ५०० कोटींचा प्रकल्प जिल्ह्यातील लोटे-परशुराम वसाहतीत उभारला जाणार.प्रकल्पासाठी अनेक गोष्टी पूरक ठरणाऱ्या.दापोली व गुहागर बंदरांचा वापर करणेही शक्य.कन्याकुमारीपर्यंत वाहतूक करणे कमी खर्चाचे.