शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

घड्याळावरून ओळखला 'त्याने' वडिलांचा मृतदेह!

By admin | Updated: October 27, 2016 21:03 IST

दुर्घटनेत एक मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे हा मृतदेह नेमका त्यांचाच आहे का? अशी शंकाही त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला घेतली होती; परंतु

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २७ : सातारा जिल्हा परिषदसमोरील लोकल बोर्डच्या इमारतीत बुधवारी रात्री लाग लागली. या दुर्घटनेत एक मृतदेह पूर्णपणे जळालेल्या अवस्थेत होता. त्यामुळे हा मृतदेह नेमका त्यांचाच आहे का? अशी शंकाही त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला घेतली होती; परंतु हातात असलेल्या घड्याळावरून अखेर उपअभियंता निवृत्ती निवृत्ती गांगुर्डे यांचा मृतदेह असल्याचे त्यांचे मुलाने ओळखला. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.

यावेळी जिल्हा परिषदेसमोरील लोकल बोर्डच्या इमारतीमध्ये आगीत होरपळून मृत्यू झालेल्या उपअभियंता निवृत्ती गांगुर्डे यांच्या मुलाने वडिलांच्या मृत्यूविषयी शंका उपस्थित केली. ही भीषण आग लागली त्यावेळी माझ्या पप्पांनी दरवाज्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न का केला नाही? असा प्रश्न गांगुर्डे यांचा मुलगा अविष्कार याने पोलिसांना विचारला आहे.

उपअभियंता निवृत्त गांगुर्डे यांची गेल्या काही महिन्यांपूर्वीच पुण्याहून साताऱ्यात बदली झाली होती. त्यामुळे त्यांची जिल्हा परिषदेमध्ये कोणाशी ओळखही नव्हती. ते शासकीय निवासस्थानी एकटेच राहत होते. ही घटना घडण्यापूर्वी ते संध्याकाळी सात वाजता पत्नी आणि मुलाशी मोबाईलवर बोलले. मी दिवाळीसाठी उद्या घरी येतोय, असे गांगुर्डे यांनी त्यांना सांगितले होते. मात्र, नियतीला हे मान्य नसावे, दिवाळी सणाला घरी जाण्यापूर्वीच गांगुर्डे यांच्यावर काळाने घाला घातला. केबीनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नाशिक येथे राहणाऱ्या गांगुर्डे यांच्या पत्नी आणि मुलाशी संपर्क साधून सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर गांगुर्डे यांची पत्नी, मुलगा, भाऊ व अन्य नातेवाईक साताऱ्यात आले.

ज्या ठिकाणी घटना घडली, ते ठिकाण पोलिसांनी नातेवाइकांना दाखविले. यावेळी गांगुर्डे यांचा मुलगा अविष्कार याला वडिलांच्या केबीनची झालेली अवस्था पाहून प्रश्न पडला. ह्यआग लागल्यानंतर पप्पांना लगेच बाहेर का पडता आले नाही. शेजारी खिडकी पण आहे, कोणाला तरी आवाज देता आला असता,ह्ण असे अनेक प्रश्न त्याने उपस्थित केले आहेत. मात्र, गांगुर्डे परिवारावर दु:खचा डोंगर कोसळल्याने पोलिसांनी त्यांचा जबाब अथवा फारशी चौकशी केली नाही. गांगुर्डे यांचा मृतदेह पहाटे पुणे येथे नेण्यात आला. या ठिकाणी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.