शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जानकर, सदाभाऊ खोत यांचा लाल दिवा निश्चित

By admin | Updated: November 14, 2015 03:53 IST

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २७ नोव्हेंबरला होणार हे निश्चित झाले असून, यामध्ये घटक पक्षांसह भाजपा-शिवसेनेच्या १० जणांचा समावेश होणार आहे

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार २७ नोव्हेंबरला होणार हे निश्चित झाले असून, यामध्ये घटक पक्षांसह भाजपा-शिवसेनेच्या १० जणांचा समावेश होणार आहे. स्वाभिमानी संघटनेकडून सदाभाऊ खोत व राष्ट्रीय समाज पक्षाकडून आमदार महादेव जानकर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.मंत्रिमंडळाच्या विस्ताराला दिवाळीनंतरचा तरी मुहूर्त लागणार का, या प्रश्नावर पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लंडन दौऱ्यावर आहेत. ते परत आल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब होईल. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने खासदार रामदास आठवले यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे; पण ते स्वत: तयार नाहीत, त्यामुळे त्यांची पत्नी सीमा आठवले अथवा दुसऱ्या नेत्यांचे नाव दिले जाऊ शकते. आमदार विनायक मेटे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. याशिवाय शिवसेनेच्या वाट्याला गेलेल्या दोन जागांचा विस्तारात समावेश आहे. उर्वरित ६पैकी चौघा जणांना भाजपाच्या वतीने संधी दिली जाणार आहे. राजकीय डावपेचाचा भाग म्हणून २ जागा रिक्त ठेवल्या जाणार आहेत. (प्रतिनिधी)मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या केल्या जाणार आहेत. नोव्हेंबरमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे. त्यानंतर जानेवारीमध्ये महामंडळांवरील सर्व नियुक्त्या केल्या जातील, अशी माहितीही मंत्री पाटील यांनी दिली. महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप मिळेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.