शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कपबशीने चुकविला घड्याळाचा ठोका

By admin | Updated: May 17, 2014 21:52 IST

राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून देणार्‍या खडकवासला मतदारसंघाने यंदा त्यांच्या विरोधात मतदान करुन घड्याळाचे काटे उलटे फिरविले आहेत.

पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना आघाडी मिळवून देणार्‍या खडकवासला मतदारसंघाने यंदा त्यांच्या विरोधात मतदान करुन घड्याळाचे काटे उलटे फिरविले आहेत. कपबशीसारखे अनोळखी चिन्ह घेवून निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांना याच मतदार संघाने मोठे मताधिक्य दिले आहे. जानकरांनी या परिसरात कोणताही प्रचार न करता मिळविलेले मताधिक्य म्हणजे प्रस्थापितांवरील जनतेचा रोष असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. बारामती मतदार संघाला शहरातील धनकवडी, कात्रज, धायरी, वडगाव, सिंहगडरस्त्याचा परिसर जोडला गेला आहे. या शिवाय खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भोर-हवेली तालुक्याच्या काही भागाचा देखील यात समावेश आहे. खडकवासला मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व भारतीय जनता पक्षाचे आमदार भीमराव तापकीर करीत असले तरी, या परिसरात राष्ट्रवादीचे नगरसेवक, जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या सदस्यांचे वर्चस्व आहे. महायुतीचे जानकर या भागाला अपरिचित असेले उमेदवार होते. खडकवासला मतदारसंघात तर त्यांनी जवळपास काहीच प्रचार केलेला नव्हता. स्वत: प्रचारफेरी काढून मतदारांच्या गाठीभेटी घेणे तर दूरच होते. तसेच त्यांनी शिवसेनेचे धनुष्य अथवा भाजपचे कमळ चिन्ह न घेता कपबशी चिन्ह घेणे पसंत केले होते. त्यातच प्रचार करण्याच्या उदासिनतेमुळे (?) त्यांना स्वत:लाच मतदारांपर्यंत पोचता आले नव्हते. त्यांचे चिन्ह पोचणे तर शक्यच नव्हते ! असे असूनही मतदारांनी जानकरांना दिलेले मताधिक्य हे प्रस्तापित उमेदवाराविरोधातील रोषच व्यक्त करतो. मतदानाच्या दिवशी देखील या भागातील राष्ट्रवादीचे नेते उदासिन होते. तर कार्यकर्ते कपबपशी चिन्हाचा प्रचार करताना दिसत होते. जानकरांनी जर महायुतीशी थेट जोडणारा कमळ अथवा धनुष्य या चिन्हाचा आधार घेतला असता तर सुळे आणखी पिछाडीवर गेल्या असत्या, असेच आता बोलले जात आहे. ------------खडकवासल्याने पाजले पाणीगेल्या २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत या भागाने सुळे यांना मोठे मताधिक्य मिळवून दिले होते. त्या वेळी भाजपच्या उमेदवार कांता नलावडे यांना खडकवासल्यातून केवळ ३२ हजार ५६० मते मिळाली होती. तर सुळे यांनी तब्बल ६२ हजार ७९८ मते (३० हजार २३८ आघाडी) मिळविली होती. या निवडणुकीत मात्र खडकवासल्यातून सुळे यांना ७० हजार ६०२ तर जानकरांना तब्बल ९८ हजार ७२९ मते मिळाली आहेत. म्हणजेच सुळे यंदा २८ हजार १२७ मतांनी पिछाडीवर आहेत.