शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

कीर्तिकर यांच्याकडे ६६ प्रभागांची जबाबदारी

By admin | Updated: October 17, 2016 01:52 IST

आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने जय्यत सुरू केली आहे.

मनोहर कुंभेजकर,

मुंबई- आगामी पालिका निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी शिवसेनेने जय्यत सुरू केली आहे. शिवसेना शाखाशाखांना भेटी देण्याची घोषणा कालच्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भाजपासोबत युती झाली किंवा झाली नाही, तरी शिवसेना पालिका निवडणुकीसाठी सज्ज असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेनेकडे मुंबईच्या प्रत्येक प्रभागात तळागाळापर्यंत कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. महिलांची मोठी संख्या ही पक्षाची जमेची बाजू मानली जाते. शिवसेनेतील दिग्गजांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे सुरू केले आहे. खासदार गजानन कीर्तिकर यांच्याकडे तब्बल ६६ प्रभागांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शिवसैनिक आणि परिचितांमध्ये ‘भाऊ’ किंवा ‘गजाभाऊ’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी पालिका निवडणुकीची अंधेरी ते थेट कांदिवलीपर्यंतच्या ६२ पूर्ण आणि ४ अर्ध प्रभाग अशा ६६ प्रभागांची जबाबदारी सोपवली आहे. क्रमांक २मधील २१ पालिका प्रभाग ३मधील २३ पालिका प्रभाग आणि ४मधील १९ पालिका असून, कांदिवली ते अंधेरी(पूर्व-पश्चिम) असे थेट येथील ९ विधानसभा मतदारसंघांतील ६६ पालिका प्रभागांमधून जास्तीतजास्त नगरसेवक निवडून आणण्याची मोठी जाबबदारी त्यांच्यावर सोपविल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.नव्या आरक्षण रचनेनुसार उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील अंधेरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघात ७५, ७६, ८०, ८१, ८४, ८६ असे ६ पूर्ण प्रभाग आणि ७२, ८३, १२१ असे तीन अर्ध प्रभाग असे एकूण ९ प्रभाग येतात. अंधेरी (प.) विधानसभा मतदारसंघातील ६४ ते ७१ असे एकूण ७ प्रभाग, वर्सोवा विधानसभा मतदारसंघातील ५७, ६०, ६१, ६२, ६३, ६८ असे ६ प्रभाग असे जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील ५२, ५३, ७२, ७३, ७४, ७७, ७३ असे ८ प्रभाग, गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ५०, ५१, ५४, ५५, ५६, ५७, ५८ असे एकूण ७ प्रभाग, दिंडोशी विधानसभा मतदारसंघातील ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४ हे ७ पूर्ण प्रभाग आणि प्रभाग क्र. ३७चा अर्धा भाग असे एकूण ८ प्रभाग येतात. असे ४५ प्रभाग आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील मालाड (प.), कांदिवली (पूर्व) आणि चारकोप विधानसभा मतदारसंघ असे येथील २१ प्रभाग अशा या ९ विधानसभा मतदारसंघांतील सुमारे ६६ प्रभागांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असल्याची माहिती सेनेच्या सूत्रांनी दिली. कीर्तिकर यांनी आत्तापर्यंत जुन्या आरक्षणाप्रमाणे ५४पैकी ४५ शिवसेना शाखांना भेटी दिल्या आहेत.