शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यांचीच हत्या

By admin | Updated: November 22, 2015 02:15 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात महात्मा गांधींचे विचार मांडत आहेत़ परंतु देशात मात्र गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विचारांची हत्या केली जात आहे. कॉ़ गोविंद पानसरे

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशात महात्मा गांधींचे विचार मांडत आहेत़ परंतु देशात मात्र गांधींचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या विचारांची हत्या केली जात आहे. कॉ़ गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत समीर गायकवाड या एकाच संशयिताला अटक झाली आहे़ त्यानंतर तपासाला विरामचिन्ह लावण्यात आले आहे. यावरून सरकार या हत्यांंचा तपास गांभीर्याने करत नाही, असा आरोप हमीद दाभोलकर यांनी केला़हमीद दाभोलकर म्हणाले, सीबीआय व सरकार यांसारख्या सर्वोच्च यंत्रणा गांभीर्याने काम करीत नाहीत. सध्याचे शासन समाजात बदलाचे आश्वासन देऊन सत्तेत आले आहे; परंतु कोणतेही चांगले बदल झालेले नाहीत. उलट या प्रकरणांकडे दुर्लक्ष केले जात आहे. फ्रान्समधील हल्ल्याचे मारेकरी दोन दिवसांत सापडले. परंतु येथे दोन-अडीच वर्षांपासून दाभोलकरांचे मारेकरी सापडत नाहीत. शैला दाभोलकर म्हणाल्या, दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाला सरकारमुळे गती येत नाही. संविधानाच्या चौकटीमध्ये राहून आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहोत. या चळवळीला नागरिकांची हवी तेवढी साथ अद्याप मिळालेली नाही. तरुण वर्ग मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला तर यंत्रणेवर नक्कीच दबाव निर्माण होईल. (प्रतिनिधी)वर्षभरात मोदींची नाही मिळाली वेळडॉ़ दाभोलकर यांच्या हत्येच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत करीत आहे़ मात्र, एक वर्षापासून आम्ही सातत्याने पाठपुरावा करूनही वेळ मिळालेली नाही़ यावरून दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासाला प्राधान्य दिले जात नसल्याचे दिसून येते, असे हमीद दाभोलकर यांनी सांगितले़