शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

किल्लारी महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे...

By admin | Updated: September 30, 2016 18:59 IST

प्रारंभी लातूरच्या पोलिस पथकाने बिगुल वाजवून श्रध्दांजली वाहिली़ त्यानंतर आठ रायफलीच्या तीनदा हवेत फैरी झाडण्यात आल्या़

हवेत रायफलीच्या फैरी झाडून श्रध्दांजलीकिल्लारीत काळा दिवस : किल्लारी, दि. ३० : ३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपाला २३ वर्षे पूर्ण झाली आहेत़ भूकंपात मृत्यूमुखी झालेल्यांना शुक्रवारी सकाळी प्रशासनाच्या वतीने किल्लारी येथे श्रध्दांजली वाहण्यात आली़ यावेळी ८ रायफलीच्या हवेत तीनदा फैरी झाडण्यात आल्या़ गावातील व्यापाऱ्यांनी दिवसभर बाजारपेठ बंद ठेऊन श्रध्दांजली वाहिली़

३० सप्टेंबर १९९३ रोजी झालेल्या महाप्रलयंकारी लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील ५२ गावे उध्दवस्त झाली. यात १० हजारपेक्षा जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले़ मोठी पशूहानी झाली़ या घटनेची आठवण झाली की आजही अंगावर शहारे येतात. शुक्रवारी जुने किल्लारी गावातील स्मृतीस्तंभास तहसीलदार अहिल्या गाठाळ यांच्या हस्ते पुष्पचक्र वाहून श्रध्दांजली वाहण्यात आली़ यावेळी सरपंच युवराज गायकवाड, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, सपोनि़ डी़ बी़ वाघमोडे, प्रा़ डॉ़ संजय मोरे, प्राचार्य कापसे, डॉ़ अशोक पोतदार, मंडळ अधिकारी टी़ जे़ यादव, व्यापारी असोशिएशन अध्यक्ष शरद भोसले, तलाठी व्यंकट पवार, प्रकाश पाटील, गणेश शिंदे, सहा़ कृषी अधिकारी कसबे, गणेश माने, ग्रामविकास अधिकारी आदमाने, दीपक पाटील, जिल्हा परिषद सदस्य बंकटराव पाटील, तलाठी विजय उस्तुरे, किशोर भोसले, हारुण अत्तार यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते़

प्रारंभी लातूरच्या पोलिस पथकाने बिगुल वाजवून श्रध्दांजली वाहिली़ त्यानंतर आठ रायफलीच्या तीनदा हवेत फैरी झाडण्यात आल्या़ या बिगुल पथकात पोहेकॉ़ माने यांच्यासह १० पोलिस कर्मचारी उपस्थित होते़ भूकंपाची ही घटना वेदनादायी असल्याने गावात हा दिवस काळ दिन म्हणून पाळला जातो़.

वनविभागाकडून माहिती घेऊकिल्लारीत चार एकरवर स्मृतीस्तंभ आहे़ या ठिकाणी उद्यान, कारंजे निर्माण करण्यात आले होते़ परंतु, आज या ठिकाणची देखभाल केली जात नसल्याने यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दुरुस्तीची शिफारस करणार आहे़ तसेच वनविभागाकडूनही माहिती घेणार असल्याचे तहसीलदार अहिल्या गाठाळ यांनी सांगितले़