शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

किडनी प्रत्यारोपण अधिकार समिती संशयाच्या भोव-यात !

By admin | Updated: December 18, 2015 02:11 IST

समितीच्या नजरेतून बनावट दस्ताऐवज कसे सुटले?

अकोला : किडणी तस्करी प्रकरणात किडणी प्रत्यारोपन करताना नियुक्त करण्यात आलेल्या समितीच्या नजरेतून बनावट दस्ताऐवज कसे सुटले, असा प्रश्न उपस्ैिंथत होत असून यामुळे ही समिती संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.संतोष गवळी, शांताबाई खरात यांच्या माध्यमातून किडनी तस्करीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी देवेंद्र सिरसाट, आनंद जाधव, विनोद पवार आणि शिवाजी कोळी यांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून औरंगाबाद, नागपूर येथील इस्पितळामधील चार डॉक्टरांची नावे समोर आली होती. आरोपींनीच किडनीदात्यांना इस्पितळामध्ये नेले होते. तेथे आवश्यक त्या सर्व तपासणी करण्यात आल्या होत्या. आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून किडनीदाते हे गरजू रुग्णांचे नातेवाईक असल्याचे भासविले आणि या डॉक्टरांच्या माध्यमातून किडनीदात्यांच्या शरीरातील किडनी काढून गरजू रुग्णांच्या शरीरामध्ये तिचे प्रत्यारोपण करण्यात आले. मानवी अवयव प्रत्यारोपण कायद्यातील तरतुदींची पायमल्ली करून हे प्रत्यारोपण करण्यात आले. कागदपत्रे खरी आहेत की खोटी आहेत, याची शहानिशा न करताच किडनी प्रत्यारोपणास परवानगी देण्यात आले असल्याचे या प्रकरणात तपासामध्ये उघड होत आहे. तपासण्या केल्या तरी किडनीदाते हे खरंच गरजू रुग्णांचे नातेवाईक आहेत का, याची पडताळणी इस्पितळातील समितीकडून झाली नसल्याचे दिसून येते. किडनी प्रत्यारोपणासाठी तयार करण्यात आलेले दस्तऐवज इस्पितळातील समितीच्या नजरेतून सुटल्यानंतर परवानीसाठी राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव गेल्यानंतर त्यांच्याकडूनही दस्तऐवजाच्या सत्यापणाची तपासणी झाली नसल्याचे तपासातून समोर येत आहे. त्यामुळे किडनी प्रत्योरोपण प्रकरणात डॉक्टरांसोबतच आता किडनी प्रत्यारोपण अधिकारी समितीही संशयाच्या भोवर्‍यात आली आहे. पोलिसांनी या दिशेने कसून चौकशी केल्यास किडनी तस्करी प्रकरणातील समितीच्या सहभागाबाबतही महत्त्वा पुरावे सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.यासंदर्भात , पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी डॉक्टरांसाठी केंद्र शासनाने संरक्षण कायदा केलेला आहे. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण करणार्‍या व इतर डॉक्टरांविरुद्ध पोलिसांना थेट कारवाईचे अधिकार नसल्याचे सांगीतले. त्यासाठी शासनाची एक समिती आहे. या समितीकडे आधी परवानगी मागावी लागते. ही समिती डॉक्टरांवरील आरोपांची चौकशी करते आणि नंतरच पोलिसांना कारवाई करण्याची परवानगी देते. त्यामुळे आम्ही बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. *कायदा काय सांगतो?मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ (होटा) नुसार किडनी देणार्‍या व्यक्तीला नातेवाईक, आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी यांच्याव्यतिरिक्तकुणाला आपली किडनी देता येत नाही. किडनी घेणार्‍यालासुद्धा हा नियम लागू आहे; परंतु घरातील व्यक्तीची किडनी गरजू रुग्णाशी जुळत नसेल, तर त्यासाठी स्वॉप ट्रान्सप्लान्टेशन (अवयवाची देवाणघेवाण) ची तरतूद आहे. यात नातेवाईक किंवा इतर व्यक्ती, जी किडनी दान करण्यास इच्छुक आहे, अशांचीच किडनी प्रत्यारोपण गरजू रुग्णाला करता येऊ शकते; परंतु अशा प्रत्यारोपणास इस्पितळाला परवानगी नाही. राज्यस्तरीय किडनी प्रत्यारोपण समितीच परवानगी देऊ शकते. काही शंका असल्यास समिती पोलिसांमार्फत तपासणी करून घेते.*समितीकडून कशी मिळते परवानगी?नातेवाईक, नात्याबाहेरील व्यक्तीची किडनी गरजू रुग्णाला देण्यासाठी राज्यस्तरीय समितीकडे प्रस्ताव पाठवावा लागतो. समितीकडे किडनी देणारा व घेणारा यांची संपूर्ण माहिती, त्यामध्ये ओळखपत्र, उत्पन्न दाखला, तीन वर्षांचे बँक स्टेटमेंट, १६ नंबरचा फॉर्म, प्रतिज्ञापत्र, रहिवासी दाखला, ना-हरकत प्रमाणपत्र यांसह किडनी देणारा व घेणारा यांची छायाचित्रे सादर करावी लागतात. या सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच किडनी प्रत्यारोपणास परवानगी द्यायची की नाही. हे समिती ठरविते.