शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

खंडणीसाठी सासऱ्याचे अपहरण

By admin | Updated: January 20, 2015 00:49 IST

बँकेत कॅशिअर असणाऱ्या सासऱ्याचे गुजरात कॉलनी येथील बँक आॅफ इंडियाच्या पार्किंग आवारातून जावयानेच अपहरण केले.

जावयाला अटक : ५० लाख रुपयांची मागितली खंडणीपुणे : बँकेत कॅशिअर असणाऱ्या सासऱ्याचे गुजरात कॉलनी येथील बँक आॅफ इंडियाच्या पार्किंग आवारातून जावयानेच अपहरण केले. या जावयाने अपहरण करून व सासू व पत्नीकडे ५० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने जावयासह तिघांना अटक केली. न्यायालयाने त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.पुरुषोत्तम श्रीपाद वेर्णेकर ऊर्फ प्रशांत श्रीपाद रेवणकर (वय ३९, रा. विसावा सोसायटी, धनकवडी), सखाराम बापू आखाडे (वय ४०, रा. मोहननगर, धनकवडी), भरत दिलीप भोसले (वय २२, रा. विनजर, ता. वेल्हा) असे आरोपींचे नाव आहे. या घटनेतील सासऱ्याची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी (दि. १७) घडली. सासरे हे कोथरूड येथील बँक आॅफ इंडियाच्या गुजरात कॉलनी शाखेत कॅशिअर म्हणून नोकरीला आहेत. घटनेच्या दिवशी ते बँकेच्या पार्किंग परिसरात आले. त्यानंतर जावई पुरुषोत्तम याने त्यांना इतर साथीदारांच्या मदतीने जबरदस्तीने पळवून नेले व त्यानंतर त्याने सासू व पत्नीकडे ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार कोथरूड पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर १८ जानेवारी रोजी सायंकाळी धनकवडी येथील तीन हत्ती चौकात आरोपी हे मारुती कारमधून सासऱ्यांना पळवून नेत असल्याचे कळाले. खंडणीविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अनिल पाटील, सहायुक्त पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई करून तिघांना अटक केली व सासऱ्यांची सुटका केली.आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपींना अपहरणाचा हेतू काय होता, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची सरकारी वकिलांनी केलेली मागणी न्यायालयाने ग्राह्य धरली. (प्रतिनिधी)