शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

खुटारीतील अंगणवाडी झाली स्मार्ट

By admin | Updated: October 19, 2016 03:11 IST

बालवयात शाळेची ओढ लागून विद्यार्थ्यांना स्मार्ट करण्याच्या दृष्टीने पनवेल तालुक्यात प्रयत्न सुरू आहेत.

वैभव गायकर,

पनवेल- बालवयात शाळेची ओढ लागून विद्यार्थ्यांना स्मार्ट करण्याच्या दृष्टीने पनवेल तालुक्यात प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार अंगणवाड्याही डिजिटल होऊ लागल्या आहेत. वावंजे विभागातील खुटारी गावातील अंगणवाडी पहिली स्मार्ट डिजिटल अंगणवाडी बनली आहे.खुटारीसह तालुक्यातील आणखी शंभर अंगणवाड्या डिजिटल होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. खुटारीतील अंगणवाडीला आयएसओ मानांकन मिळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये मिळणारे दर्जेदार शिक्षण, शैक्षणिकसुविधांमुळे या शाळांकडे सर्वांचाच ओढा आहे. आता तालुक्यातील अंगणवाड्याही सुसज्ज होत आहेत. खुटारीतील अंगणवाडीची इमारत पाहिल्यावर लगेच शैक्षणिक गुणवत्ता कळते. आकर्षक फलक आणि रंगवलेल्या भिंतींपासून मुलांची पावले अंगणवाडीकडे वळतात. प्रत्येक भिंत डिजिटल फ्लेक्सने रंगविली असून त्यावर चित्रलिपीतील बाराखडी काढण्यात आली आहे. राष्ट्रपुरुषांची छायाचित्रे, दिशा फलक, वेगवेगळे कार्टून्स येथे पाहायला मिळतात. अंगणवाडी सेविका ज्योती म्हात्रे, तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच जनार्दन पाटील, उपसरपंच सुभाष पाटील, रवी पाटील, विलास म्हात्रे, निकिता म्हात्रे, लीना म्हात्रे, मधुकर म्हात्रे आदींनी यासाठी पुढाकार घेतला असून लोकसहभागातूनच ही अंगणवाडी स्मार्ट डिजिटल झाली आहे. विशेषत: महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी राजन सांबरे, विस्तार अधिकारी संतोष ठोंबरे, पर्यवेक्षिका प्रियांका कदम यांनी वारंवार मार्गदर्शन केले.