शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
3
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
4
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
5
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
6
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
7
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
8
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
9
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
10
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
11
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
12
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
13
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
14
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
15
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
16
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
17
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
18
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
19
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
20
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती

‘खरीप’ संकटात!

By admin | Updated: July 12, 2014 22:22 IST

पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात असून, 4क् टक्के भात रोपवाटिका संकटात सापडल्या आहेत.

पुणो : पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटात असून, 4क् टक्के भात रोपवाटिका संकटात सापडल्या आहेत. तर पुरंदर, बारामती, इंदापूर, शिरूर व दौंडमध्ये येत्या आठवडाभरात समाधानकारक पाऊस न झाल्यास तेथील शेतक:यांना खरिपाचा हंगाम कोरडा घालवावा लागणार आहे. त्याऐवजी त्यांनी थेट रब्बी पिके घ्यावीत, असा सल्ला कृषी विभागातर्फे देण्यात आला आहे. 
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टंचाई बैठकीत जिल्ह्यातील कृषी परिस्थितीचादेखील आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात 11 जुलैअखेर केवळ दोन टक्के पेरण्या झालेल्या असून, खरिपाची स्थिती बिकट असल्याचे सांगण्यात आले. 
या पाश्र्वभूमीवर, जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानेश्वर बोटे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात भाताचे 6क् हजार हेक्टर क्षेत्र असून, त्यासाठी साडेपाच हजार हेक्टरवर भात रोपवाटिका तयार केल्या जातात. पावसाने ओढ दिल्याने त्यातील 4क् टक्के भात रोपवाटिका बाधित झाल्या असून, त्यातील 25 ते 3क् टक्के वाटिका उद्ध्वस्त झाल्या आहेत. गेले काही दिवस होत असलेल्या रिमङिाम पावसामुळे काही वाटिकांना जीवदान मिळाले आहे.’’
पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर जलस्रोत असलेल्या ठिकाणी शेतकरी गटांनी एकत्र येऊन भात रोपवाटिका केल्यास त्यांना बियाणो, खतांसाठी 48 हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्यात येईल. तसेच, रोपांचा कालावधी कमी होण्यासाठी रहू पद्धतीने वाटिका करावी. 
बियाणो 24 तास पाण्यात भिजत ठेवून, नंतर ते भिजलेल्या गोणपाटात दोन दिवस ठेवावे. कोंब आलेले बियाणो वाटिकेच्या ताफ्यावर टाकल्यास त्याचा फायदा होतो. पेरणी लांबल्याने एकाऐवजी तीन ते चार रोपांची पेरणी करावी लागेल. मात्र, पाऊस लांबल्यास 15 ते 2क् जुलैदरम्यान डोंगरमाथ्यावरील जमिनीत भाताऐवजी नाचणी घ्यावी. भोर, वेल्हे, मावळ, मुळशी, तसेच खेड व आंबेगावच्या काही भागांत ही पद्धत वापरावी, असा सल्ला बोटे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
 
जुन्नर, आंबेगाव, हवेली येथे मूग, उडीद, ज्वारी याऐवजी बाजरी, भुईमूग, सोयाबीन व चारापीक उपयोगी ठरेल. पुरंदर, इंदापूर, बारामती, शिरूर व दौंड येथे येत्या आठवडाभरात 5क् ते 1क्क् मिलिमीटर पाऊस पडल्यास तेथील शेतक:यांनी बाजरी व तूर पीक घ्यावे; अन्यथा खरीप हंगाम कोरडा घालवावा. 
- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा कृषी अधीक्षक
 
शेतात 1क् मीटर अंतरावर स:या घालून चौकोनी वाफे करावेत. त्यात पाणी जिरवून सप्टेंबरअखेरीस रब्बी पीक घ्यावे. 
 
कृषी विमा योजना
शेतक:यांना येत्या 31 जुलैअखेर राष्ट्रीय कृषी पीकविमा योजनेत सहभागी होता येईल. भातपिकासाठी हेक्टरी 337.5क्, ज्वारी 265.5क्, बाजरी 2क्1.6क्, मका 481.5क्, नाचणी 281.7क्, उडीद 295.2क्, मूग, 271.8क्, तूर 42क्.3क्, भुईमूग 749.5क् व सोयाबीन 541.8क् रुपये विमा हप्त्यापोटी शेतक:यांना भरावे लागतील. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.