शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

खारघरला ४५ लाख पकडले

By admin | Updated: December 28, 2016 01:21 IST

जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देणाऱ्या रॅकेटच्या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ लाख रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या

नवी मुंबई : जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा देणाऱ्या रॅकेटच्या पाच जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४५ लाख रुपये मूल्याच्या दोन हजार रुपयांच्या २२५० नव्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अटक केलेले सर्व जण खारघर व तळोजा परिसरातील राहणारे आहेत. त्याठिकाणी सरकारने बंदी घातलेल्या जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी काही जण येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष तीनला मिळाली होती. यानुसार उपआयुक्त दिलीप सावंत, सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उत्तम दुंदळे, प्रतापराव कदम, श्रीकांत शिंदे, उपनिरीक्षक सुनील सावंत यांच्या पथकाने सोमवारी त्याठिकाणी सापळा रचला होता. खबऱ्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी प्रथमेश अपार्टमेंटमधील कार्यालयावर छापा टाकला असता, त्याठिकाणी पाच जण होते. झडतीमध्ये त्याठिकाणी ४५ लाख रुपये किमतीच्या दोन हजार रुपयांच्या २२५० नव्या नोटा आढळून आल्या. परंतु या नोटांसंबंधी त्यांच्याकडून योग्य स्पष्टीकरण मिळू शकले नसल्याचे सहाय्यक आयुक्त नितीन कौसडीकर यांनी सांगितले. त्यानुसार जयदास तेलवणे (३४), सुरेश पाठक (३२), इक्बाल पटेल (४६), महेश पटेल (३१) व जुबेर पटेल (४०) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले सर्व जण खारघर व तळोजा परिसरातील राहणारे असून दूध विक्री, रेती सप्लायर तसेच कॉन्ट्रॅक्टर असा त्यांचा व्यवसाय आहे. १ कोटी रुपयांच्या नोटा बदलीसाठी १२ टक्के कमिशन घेवून त्यांच्याकडून काळ्याचे पांढरे करण्याचे रॅकेट चालवले जात होते. त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात नव्या नोटा आल्या कुठून याचा उलगडा पोलिसांना झालेला नाही. त्याशिवाय या रॅकेटमध्ये अजून इतर कोणाचा सहभाग आहे का, तसेच यापूर्वी त्यांनी कोणाला नोटा बदलून दिल्या आहेत का ? याचाही अधिक तपास गुन्हे शाखा पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)पी.ए.टी. इन्फ्रा अ‍ॅग्रो कार्यालयातून रॅकेटजुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटांकरिता एक कोटी रुपयांसाठी १२ टक्के कमिशन घेऊन काळ्याचे पांढरे करणाऱ्या रॅकेटच्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. खारघर सेक्टर १९ येथील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये पी.ए.टी. इन्फ्रा अ‍ॅग्रो नावाच्या कार्यालयातून हे रॅकेट चालवले जात होते.