शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

खाकी वर्दीतील समुपदेशकाने केला चमत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 04:05 IST

लहानपणीच त्याचे आईवडिलांचे छत्र हरवले. तो १३ ते १४ वर्षांचा होईपर्यंत आजीने त्याचा सांभाळ केला

जितेंद्र कालेकर,

ठाणे- लहानपणीच त्याचे आईवडिलांचे छत्र हरवले. तो १३ ते १४ वर्षांचा होईपर्यंत आजीने त्याचा सांभाळ केला. मात्र, अचानक कुसंगतीमुळे तो व्यसनाधीन झाला. व्यसनांची पूर्तता करण्यासाठी आजीलाच शिवीगाळ आणि मारहाण करू लागला. आपल्या नातवाची हीच तक्रार घेऊन आजीने पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी त्याला आपला खाक्या न दाखवता त्याचे कौन्सिलिंग केले. पोलिसांनी आपल्या डोळ्यांत अंजन घातले असून आता आपण सन्मार्गाने आणि सन्मानाने जगणार असल्याची ग्वाही त्याने पोलिसांना दिली आहे. किसननगरमध्ये राहणारा राहुल पवार (नाव बदलले आहे) हा आपल्या आजीकडे वाढला. तो तीन वर्षांचा असतानाच त्याच्या आईचे निधन झाले, तर वडिलांनी दुसरे लग्न केले. लहानपणापासूनच आईवडिलांच्या प्रेमाला पारखा झालेल्या राहुलचा त्याच्या वडिलांच्या आईने सांभाळ केला. त्याचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर तो अकरावीत गेला. कॉलेजला काही मित्रांच्या संगतीने तो व्यसनाच्याही आहारी गेला. कॉलेजची हवा लागून बिघडलेला हा छोकरा आजीला शिवीगाळ आणि मारहाणही करू लागला. सिगारेट किंवा तंबाखूसाठी पैसे मागत असल्याचे समजताच आजीने त्याला पैसे देणे बंद केले. त्यामुळे तो कोपरीतील त्याच्या आत्याकडे वरचेवर जाऊ लागला. पण, तिथे त्याची पैशांची मागणी पूर्ण न झाल्याने पुन्हा तो किसननगरला येऊन आजीलाच त्रास देऊ लागला. अखेर, शनिवारी (१४ जानेवारी रोजी) नातवाची तक्रार घेऊन आजीने श्रीनगर पोलीस ठाणे गाठले. या अल्पवयीन मुलाविरुद्ध तक्रार नोंदवून त्याला पोलिसी खाक्या दाखवला, तर या मुलाच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होईल. याला असाच सोडून दिले, तर कदाचित आजीच्या जीवाचे बरेवाईट होण्याची भीतीहोती. पोलिसांनी आजीला घरी पाठवून वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम.सी. कारकर यांनी त्याला व्यसन आणि कुसंगतीमुळे कसे वाईट परिणाम होऊ शकतात, या वास्तवाची जाणीव करून दिली. आईवडील बनून सांभाळ करणाऱ्या आजीचे महत्त्व कारकर यांनी दिवसभर पटवून दिले. मुलाने चांगल्या वर्तनाची दिलेली हमी व आत्याला त्याच्यावर लक्ष ठेवण्याची सूचना करून कारकर यांनी त्याला घरी पाठवले. पुढील किमान आठवडाभर दररोज पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले असून त्याच्या वागण्यातील बदलावरही नजर ठेवली जाणार असल्याचे कारकर यांनी स्पष्ट केले. >आणखी चौघांमध्ये अशीच केली सुधारणाकिसननगरमधील आणखी चार तरुणांचे पोलिसांनी अशाच प्रकारे मतपरिवर्तन केले आहे. अंधेरीला चांगल्या पगारावर नोकरीला असणाऱ्या या तरुणांना नशा येणाऱ्या व्हाइटनर सेवनाचे व्यसन लागले होते. याची तक्रार पालकांनीच पोलिसांकडे केल्यानंतर कारकर यांच्या पथकाने त्यांचे मतपरिवर्तन करून त्यांना पोलीस ठाण्यात रोज हजेरी लावण्यास भाग पाडले. त्यांच्यातही सुधारणा होऊन ते निर्व्यसनी झाल्यामुळे त्यांच्या पालकांनीही पोलिसांचे आभार मानले आहेत.