शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
2
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
3
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
4
अकोला: शेतातून घरी परत असतानाच काळाची झडप, पित्यासह मुलगा पुरात गेला वाहून; मुलाचा मृतदेह सापडला
5
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
6
घटस्फोटीत महिलेशी फेसबुकवर मैत्री, भेटायला बोलावून बलात्कार, अंधेरीतील घटना!
7
"आता हे अचानक 'हशणार, बशणार' हे कुठून आलं?", अभिनेत्रीचा 'पुणे'करांना सवाल
8
Shravan 2025: श्रावणात 'या' राशींवर होणार महादेवाची कृपा; बरसणार सुखाच्या श्रावणसरी!
9
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
10
Deep Amavasya 2025: 'या' सोप्या टिप्स कामी येतील, तेलातुपाचे दिवे लख्ख उजळतील!
11
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
12
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
13
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
14
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
15
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
16
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
17
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
18
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
19
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
20
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल

खडसेंच्या राजीनाम्याचे जळगावमध्ये पडसाद

By admin | Updated: June 4, 2016 19:22 IST

महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्यानंतरमुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करीत जाळपोळ केली तर शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला

ऑनलाइन लोकमत - 
जळगाव, दि. 04 - महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची  बातमी कळताच जिल्ह्यात जोरदार पडसाद उमटले. खडसेंचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगरात कार्यकर्त्यांनी रास्तारोको आंदोलन करीत जाळपोळ केली. तसेच कडकडीत बंद पाळला. तुलनेत जळगाव शहरात शांतता होती. सकाळी पक्षाच्या बळीराम पेठेतील जिल्हा कार्यालयात शुकशुकाट होता. मात्र दुपारी आमदार सुरेश भोळे व पदाधिकारी  व काही नगरसेवक तसेच कार्यकर्ते  कार्यालयात जमले. तेथे बैठक सुरू होती. दुसरीकडे शिवराम नगरातील खडसे यांच्या निवासस्थानी सुरूवातीस शांतता होती मात्र १२.३३ वाजता खडसे यांच्या कन्या जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांचे या ठिकाणी आगमन झाले. 
 
खडसे यांच्या निवासस्थानी १२ वाजण्याच्या सुमारास प्रथम बंदोबस्तासाठीचा एक कॉस्टेबल व घरातील कर्मचारी वर्ग होता. १२.३३ वाजेच्या सुमारास जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर या शिवराम नगरातील निवासस्थानी आल्या. त्यांच्या समवेत प्रांजल खेवलकर हेदेखील होते. त्या पाठोपाठ माजी महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस दीपक फालक हेदेखील या ठिकाणी आले. दुपारी खडसे कुटुंबिय मुक्ताईनगरकडे रवाना झाले.
 
विरोधकांनी फोडले फटाके
शिवसेना तसेच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी टॉवर चौकात मिठाई तसेच साखर वाटप केली.