शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

खड्डे नागरिकांचीही जबाबदारी -महापौर

By admin | Updated: July 13, 2016 04:19 IST

अनेक वादग्रस्त विधान करून गोत्यात आलेल्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आता खड्डे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे, अशी मुक्ताफळे उधळत आधीच खड्ड्यांमुळे त्रासलेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

मुंबई : अनेक वादग्रस्त विधान करून गोत्यात आलेल्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी आता खड्डे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे, अशी मुक्ताफळे उधळत आधीच खड्ड्यांमुळे त्रासलेल्या मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळले आहे.महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी मुंबईत ६६ खड्डे असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण तापले़ विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत मुंबईतील खड्डे मोजण्याची मोहीमच सुरू केली़ मात्र विरोधी पक्षांऐवजी सध्या मित्रपक्षच शिवसेनेसाठी डोकेदुखीचे कारण ठरले आहे़ शिवसेनेला मित्रपक्ष भाजपानेच आज खड्ड्यांचे दर्शन घडविले़ खड्ड्यांवरून वातावरण तापत असताना त्याला समर्पक उत्तर देण्याऐवजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी खड्डे ही नागरिकांचीही जबाबदारी आहे़ तक्रार करण्यापूर्वी तो रस्ता कोणाचा आहे, याची माहिती असावी, असे वादग्रस्त विधान करत त्यांनी अधिकाऱ्यांना रस्ता कोणाचा त्या यंत्रणेचे नावही त्या ठिकाणी लिहिण्यास सांगितले़ तसेच भाजपा नेत्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणांची दखल घेणार, असा बचाव करीत आंबेकर यांनी युतीतील वादावर पांघरुण घातले़ (प्रतिनिधी)पायधुनी विभागात काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका वकारुन्नीसा अन्सारी या आज त्यांच्या विभागातील तक्रारींचे निवारण करण्यासाठी गेल्या असता रहमतुल्ला मार्गावरील एका खड्ड्यात त्यांचा पाय गेला व त्या पडल्या़ यात त्यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली आहे़ त्यांच्यावर जे़जे़ रुग्णालयात उपचार करण्यात आले़काँग्रेसने आता आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पॉटहोल दिंडी काढण्याचा इशारा दिला आहे़ त्यानुसार १५ जुलै रोजी ११ वाजता फॅशन स्ट्रीट ते महापालिका मुख्यालय असा दिंडीचा प्रवास असेल.