शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

खडसे यांची मंगळवारी सुनावणी

By admin | Updated: February 13, 2017 22:29 IST

भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटींग समितीची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उलट तपासणी सुरू

ऑनलाइन लोकमत

नागपूर, दि. 13 - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या झोटींग समितीची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता उलट तपासणी सुरू असून मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी खडसे यांची उलटतपासणी होणार आहे. आपली बाजू मांडण्यासाठी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना बोलावण्यात आले आहे. समितीसमोर ते स्वत: किंवा वकीलामार्फत सुद्धा बाजू मांडू शकतात. परंतु ते स्वत: आले तर आपली बाजू अधिक सक्षमपणे मांडू शकतील. यापूर्वी सुद्धा त्यांना बोलावण्यात आले होते. परंतु त्यांनी आपल्यावकीलांना पाठविले होते. तेव्हा मंगळवारी खडसे स्वत: येणार की आपल्या वकिलांना पाठविणार याकडे लक्ष लागले आहे. एकनाथ खडसे यांनी महसूल मंत्री असतांना पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील जमीन आपल्या नातेववाईकांना दिली. ही जमीन उद्योग विभागाची असून खडसे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून दिल्याचा आरोप आहे. विरोधकांनी याकारणावरूनघेरल्याने खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती डी. झोटींग यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. समितीने भोसरीला जाऊन जागेची पाहणी केली. मुंबई मंत्रालयातील उद्योग विभागाकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतचर दोन्ही विभागाकडून आवश्यक सर्व कागदपत्रे समितीने मागवून घेतले. आपले मत मांडण्यासाठी खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती. वकिलांनी त्यांच्यावतीने शपथपत्र दाखल केले होते. दरम्यान महसूल आणि उद्योग विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले. हिवाळी अधिवेशन काळातच प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली. उद्योग विभगाचे सचिवही हजर झाले होते. त्यांनी आपली बाजू मांडली.यानंतर उलटतपासणीला सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यातच खडसे यांना बोलावण्यात आले होते. परंतु तेव्हा त्यांच्यावतीने त्यांच्या वकीलांनी बाजू मांडली होती. या पाश्वभूमीवर मंगळवारी ते स्वत: येतील का याकडे लक्ष आले आहे.१५ फेब्रुवारीला मुदत संपतेयझोटींग समितीला तीन वेळा मूदत वाढ देण्यात आली आहे. तिसरी मुदतवाढ ही येत्या १५ फेब्रुवारी रोजी संपत आहे. आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी समितीतर्फे शासनाला प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती आहे. समितीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळे लवकरच शासनाला प्रस्ताव सादर होणार असल्याचे सांगितले जाते.