शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
 काश्मीरमधील किश्तवाड येथील चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, दोघांना लष्कराने घेरले 
4
हेरगिरी प्रकरणात ज्योती मल्होत्राला दिलासा नाही, पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ; बँक खात्याची चौकशी सुरूच
5
पाकिस्तानने स्वतः युद्धविरामाची चर्चा केली, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला!
6
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
7
आधी वैभव सूर्यवंशीसोबत खोटा फोटो, आता प्रीती झिंटाची थेट कोर्टात धाव, नेमकं प्रकरण काय?
8
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
9
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
10
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
11
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
12
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
13
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
14
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
15
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
16
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
17
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
18
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
19
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
20
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती

खडसे-दाऊद कॉल; ठोस पुरावे द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2016 04:21 IST

महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात संभाषण झाल्याचे ठोस पुरावे सादर करा, असे निर्देश गुजरातच्या हॅकरला देत उच्च न्यायालयाने त्याला याचिकेत सुधारणा

मुंबई : महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम यांच्यात संभाषण झाल्याचे ठोस पुरावे सादर करा, असे निर्देश गुजरातच्या हॅकरला देत उच्च न्यायालयाने त्याला याचिकेत सुधारणा करण्याची सूचनाही केली. उच्च न्यायालयाने याचिकेत नमूद करण्यात आलेल्या मुद्द्यांवर अनेक प्रश्नही उपस्थित केले.महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या नावाने नोंद केलेल्या मोबाइल नंबरवरून पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेला कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याला अनेक कॉल करण्यात आल्याचा दावा गुजरातचा हॅकर मनिष भंगाळे याने केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भंगाळे याने याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. प्रकाश देव यांच्या खंडपीठापुढे होती.‘दाऊदला आठ वेळा कॉल केला म्हणजे गुन्हा ठरतो का? काय संभाषण झाले, हे महत्त्वाचे आहे. याविषयी पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला का?’ अशी विचारणा अ‍ॅड. सावंत यांच्याकडे न्यायालयाने केली.खडसे आणि दाऊद यांच्यात काय संभाषण झाले, याचीच चौकशी करायला पाहिजे, यासाठीच ही याचिका दाखल करण्यात आली, अशी माहिती अ‍ॅड. सावंत यांनी खंडपीठाला दिली. तसेच खडसे प्रकरणी भंगाळेची गुन्हे अन्वेषण विभागाने पाच तास चौकशी केली तरीही या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात न घेता गुन्हे अन्वेषण विभागाने खडसेंना क्लीन चिट दिली. आता पुन्हा एटीएसप्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र भंगाळे जाणार नसल्याचेही अ‍ॅड. सावंत यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर खंडपीठाने याचिकाकर्त्याला ठोस पुरावे सादर करून याचिकेत सुधारणा करण्याचे निर्देश देत याचिकेवरील पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर ठेवली आहे. (प्रतिनिधी) मेहजबीन शेख कोण? भंगाळे याने खडसेंच्या मोबाइलवरून मेहजबीन शेख हिला कॉल केल्याचे याचिकेत म्हटले आहे. त्यावर खंडपीठाने मेहजबीन शेख कोण आहे, अशी विचारणा याचिकाकर्त्याचे वकील संदेश सावंत यांच्याकडे केली. मेहजबीन शेख ही दाऊदची पत्नी असल्याची माहिती अ‍ॅड. सावंत यांनी खंडपीठाला दिली.