शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

खडसे प्रकरणाची सीबीआय चौकशी?

By admin | Updated: May 28, 2016 04:40 IST

मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा पत्रकार परिषदेत लेखाजोखा मांडत सरकारचे कौतुक करणारे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांना अचानक एकनाथ खडसे यांच्याविषयीच्या

- नितीन अग्रवाल,  नवी दिल्ली

मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा पत्रकार परिषदेत लेखाजोखा मांडत सरकारचे कौतुक करणारे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शाह यांना अचानक एकनाथ खडसे यांच्याविषयीच्या प्रश्नांनी अस्वस्थ केले. खडसे यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या घरून आलेल्या फोनवरून त्यांना पत्रकार परिषदेत सवाल केला जाताच, हा प्रश्न राज्य सरकारचा आहे आणि मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील, असे सांगत त्यांनी प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. अर्थात पोलिसांनी या प्रकरणातील तपासाची माहिती दिली असल्याचे नमूद करीत, त्या आरोपांत तथ्य नसल्याचेही शाह यांनी सूचित केले.पत्रकार परिषदेनंतर अनौपचारिक गप्पांमध्ये खडसे यांच्याविषयी विचारता, या प्रकरणाची केंद्रीय नेतृत्वाने गंभीर दखल घेतली असल्याचे शाह म्हणाले, असे वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिले आहे. खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी गृह मंत्रालयातर्फे करणार का, याबाबत बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. केंद्रात आणि राज्यात सत्तेमध्ये सहभागी असलेली शिवसेना रोजच्या रोज तुमच्या पक्षावर आणि पंतप्रधानांवर टीका करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले असता, शाह हसतच म्हणाले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये पूर्णपणे लोकशाहीच आहे.दरम्यान, महाराष्ट्राचे महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित संभाषण सीबीआयच्या रडारवर आले आहे. शुक्रवारी सीबीआयने मुंबईतील दहशतवादविरोधी पथकाला (एटीएस) त्याबाबत माहिती मागितल्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. खडसेंचे दाऊदसंबंधी संभाषण असो की त्यांच्या निकटस्थांचे लाचप्रकरण असो, तपास सीबीआयकडे सोपविणे राज्य सरकारवर अवलंबून असेल. अद्यापपर्यंत सीबीआयला तशी शिफारस करण्यात आलेली नाही. खडसेंनी याबाबत गृहमंत्रालय आणि अन्य विभागाला पाठविलेली पत्रे सीबीआयच्या सुपुर्द करण्यात आल्यास प्राथमिक चौकशी (पीई) नोंदविली जाऊ शकते.२४ तासांत क्लीन चिट आश्चर्यकारकमुंबई एटीएसने कॉल प्रकरणी २४ तासांपेक्षा कमी काळात खडसेंना क्लीन चिट दिल्याबद्दल सीबीआयने आश्चर्य व्यक्त केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी गंभीर प्रकरणांमध्ये सखोल चौकशीची गरज असते. सर्वोच्च न्यायालयाने दाऊदला मुंबई बॉम्बस्फोट आणि अन्य अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरविले आहे. या पार्श्वभूमीवर सीबीआय गुप्तचर संस्थेकडून(आयबी) आणखी माहिती मागवू शकते, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.हा प्रश्न राज्य सरकारचा आहे आणि मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतील.- अमित शाह, भाजपाध्यक्ष