शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

खडसे हे तर भाजपातील भुजबळ - दमानिया

By admin | Updated: May 26, 2016 01:21 IST

महसूलमंत्री एकनाथ खडसे हे तर भाजपामधील भुजबळ आहेत, असा आरोप करत मी त्यांच्या जमिनी, संस्था यांची माहिती घेऊन ती जनतेसमोर आणणार आहे, असा दावा सामाजिक

जळगाव : महसूलमंत्री एकनाथ खडसे हे तर भाजपामधील भुजबळ आहेत, असा आरोप करत मी त्यांच्या जमिनी, संस्था यांची माहिती घेऊन ती जनतेसमोर आणणार आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्र्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना केला.महसूलमंत्री खडसे यांच्या मोबाइलवर कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या घरून आलेले कथित फोनकॉल्स, जावयाची लिमोझीन कार आणि पुण्यातील जमीन खरेदीमुळे खडसे सध्या चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणांवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना दमानिया यांनी तापी पाटबंधारे महामंडळांतर्गत असलेल्या लोअर तापी प्रकल्पाच्या गेटचे काम, तापी नदीवरील तीन पुलांचे बांधकाम आणि खडसेंच्या मतदारसंघातील कुऱ्हा वढोदा उपसा योजनेची सविस्तर माहिती घेतली. ती पुरविण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये एकच धावपळ सुरू होती. ही माहिती मिळावी यासाठी दमानिया पाटबंधारे विभागाच्या गिरणा या कार्यालयात रात्रीपर्यंत बसून होत्या. दमानिया म्हणाल्या, दोन सिंचन प्रकल्पांमध्ये गंभीर प्रकार घडले आहेत. लोअर तापीचे काम श्रद्धा कन्स्ट्रक्शनचे शिवाजी जाधव यांना दिले गेले आहे. त्यांची सविस्तर माहिती प्राप्त झाल्यावर ती उघड करीन. ते त्या जमिनींवर काय शेती करतात हे बघायचे आहे, असेही दमानिया म्हणाल्या. (प्रतिनिधी)