शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

केरळचे दोडामार्ग कनेक्शन धोकादायक

By admin | Updated: July 24, 2015 00:56 IST

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर : गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे आश्रयस्थान

वैभव साळकर -दोडामार्ग  -महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या तिन्ही राज्यांच्या सरहद्दीवर वसलेला दोडामार्ग तालुका परराज्यातील गुन्हेगारांना सोयीचे आश्रयस्थान वाटू लागला आहे. गेल्या काही वर्षात केरळमधील खून, तस्करी आणि अंमली पदार्थ विक्रीत गुुंतलेल्या गुन्हेगारांना दोडामार्ग तालुक्यातून अटक करण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे केरळीयनांचे सिंधुदुर्ग आणि पर्यायाने दोडामार्ग कनेक्शन भविष्यात जिल्ह्याच्या कायदा-सुव्यवस्थेसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवा तालुका म्हणून दोडामार्गची निर्मिती झाली. पश्चिमेला गोवा, पूर्वेला कर्नाटक अशा दोन्ही राज्यांच्या सरहद्दीवरील हा तालुका भौगोलिकदृष्ट्या खडतर आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या कुशीत दोडामार्गची निर्मिती झाली आहे. कृषीक्षेत्रासाठी अनुकूल परिस्थिती याठिकाणी असल्याने पराज्यातील लोकांनीसुद्धा तालुक्यात शेतीसाठी शिरकाव केला आहे. केरळीयन लोकही त्याला अपवाद नाहीत. गेल्या दहा वर्षात तालुक्यात केरळीयनांचे प्रस्थ चांगलेच वाढले आहे. केळी, अननस आणि रबर लागवडीच्या नावाखाली केरळीयनांनी इथल्या डोंगरदऱ्यांमधील जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन तालुक्यात शिरकाव केला आहे. केरळीयनांच्या या वाढत्या प्रस्थाला अनेकवेळा शिवसेनेने विरोध केला. मध्यंतरीच्या काळात सेनेने पुंगी बजाव, लुंगी हटाव मोहीम हाती घेतली. मात्र, त्यावेळी प्रांतवादाच्या पार्श्वभूमीवर राजकारण चांगलेच पेटले होते. कालांतराने केरळीयन लोकांचाच तालुक्यातील गांजा लागवडीत हात असल्याचे समोर आले. त्याला अटकही झाली आणि केरळीयनांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पुढे आली. काही दिवसांनी केरळ राज्यातील कम्युनिस्ट नेते टी. चंद्रशेखरराव रेड्डी यांची हत्या झाली. ही बातमी अनेक वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्ध झाली. मात्र, त्या हत्येमागील मुख्य आरोपी फरार होता. काही दिवसांनंतर हाच आरोपी दोडामार्ग तालुक्यात भेडशी याठिकाणी येऊन लपून बसल्याचे समोर आले. केरळ पोलिसांकडून त्याला अटकही झाली आणि पुन्हा केरळीयनांच्या वाढत्या प्रतापांबाबत चर्चा सुरू झाली. दोन दिवसांपूर्वी भिकेकोनाळ येथे केरळीयनाने केलेल्या आत्महत्येमागेही ही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे उघड झाले. त्याठिकाणी हस्तीदंत तस्करीत गुंतलेला मुख्य आरोपी हा आत्महत्या करणारा व्यक्ती होता, हे स्पष्ट झाले. त्यामुळे केरळीयनांच्या सिंधुदुर्ग कनेक्शनविषयी तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. ठराविक कालावधीनंतर गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या केरळीमधील मुख्य आरोपींना अटक झाल्याने तालुक्यातील केरळीयनांचे वाढते प्रस्थ आता धोकादायक ठरू लागले आहे. तिलारी खोऱ्यातील बहुतांशी जमिनी या सध्या केरळीयनांच्या ताब्यात आहेत. ज्याठिकाणी स्थानिक शेतकरी पोहोचू शकत नाहीत, अशा अवघड दुर्गम ठिकाणी केरळीयन लोकांनी जावून मेहनत व चिकाटीच्या जोरावर रबर व अननसाच्या बागा फुलविल्या आहेत. त्यांची ही मेहनत नक्कीच आदर्श घेण्यासारखी आहे. परंतु त्याचबरोबर त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीही विचार करायला लावणारी आहे. राज्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आलेख गुन्हेगारीच्या बाबतीत फारच कमी आहे. मात्र, गुन्हेगारी पार्र्श्वभूमीच्या केरळीयन लोकांमुळे जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शेतीमागे दडलंय काय?तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्राबाहेरील जमिनीत परप्रांतीय केरळीयन लोकांनी रबर लागवड केली आहे. मात्र, याठिकाणी अंमली पदार्थांची लागवड झाल्याचा आरोप होतो आहे. पाच वर्षांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपांमध्ये तथ्य असल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, पुन्हा अंमली पदार्थ विक्री प्रकरणात गुंतलेल्या लोकांनी आपले डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. मनुष्यवस्तीपासून दूरवर असलेल्या या भागात शेतीच्या निमित्ताने घेतलेल्या जमिनीत कोणती लागवड करण्यात आली, हे तपासणे गरजेचे आहे.