शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहातून बाहेर पडताच केली चोरी

By admin | Updated: August 4, 2016 22:34 IST

कारागृहातून बाहेर पडताच एका अट्टल चोरट्याने पहिला हात मंदीरात मारला. त्यानंतर त्याने एक स्कुटी चोरली. मंदीरातील दानपेटीतून १० ते १५ हजारांची रक्कम चोरल्यानंतर

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. ४ -  कारागृहातून बाहेर पडताच एका अट्टल चोरट्याने पहिला हात मंदीरात मारला. त्यानंतर त्याने एक स्कुटी चोरली. मंदीरातील दानपेटीतून १० ते १५ हजारांची रक्कम चोरल्यानंतर ही रक्कम तो उधळू लागला अन् त्याचमुळे तो गुन्हेशाखेच्या हातात सापडला. शूभम उर्फ अब्दूल ललित यादव (वय २१) असे आरोपीचे नाव आहे. तो धंतोलीतील कुंभारटोलीत, गजानन मंदीराजवळ राहतो. आरोपी यादव अट्टल गुन्हेगार आहे. त्यामुळे त्याची आत-बाहेर अशी जेलयात्रा सुरूच राहते. एका गुन्ह्यातून तो २७ जुलैला कारागृहातून सुटून बाहेर आला. त्यानंतर त्याच्या डोक्यात गुन्हेगारीचा किडा वळवळू लागला. वर्धा मार्गावरील हल्दीराम समोर जागृत हनुमान मंदीर आहे. येथे चोरी केल्यास मोठी रक्कम हाती लागेल, असा अंदाज बांधून त्याने ३१ जुलैच्या रात्री मंदीराच्या चॅनल गेटचे कुलूप तोडले. त्यानंतर आत असलेल्या तीन दानपेट्या फोडून यादवने १० ते १५ हजारांची रक्कम लंपास केली. एवढेच नव्हे तर यशवंत स्टेडिअमजवळून एक स्कुटीही (एमएच ३४/ जे ५७३४) चोरली. उधळपट्टी नडली कारागृहातून नुकताच बाहेर पडलेला यादव रक्कम उधळत असल्याची माहिती कळताच गुन्हेशाखेचे अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने यादवकडे नजर रोखली. बुधवारी त्याला जेरबंद करून बोलते केले असता त्याने मंदीरातील दानपेटी तसेच स्कुटीचोरीची कबुली दिली. ती जप्त केल्यानंतर त्याला गुन्हेशाखेच्या पथकाने धंतोली पोलिसांच्या हवाली केले. पोलीस निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे, सहायक निरीक्षक प्रशांत चौगुले, सहायक उपनिरीक्षक ज्ञानेश्वर तांदुळकर, हवलदार सुखदेव मडावी, महादेव सातपुते, राजू डांगे, धर्मेंद्र सरोदे, नायक रविंद्र राऊत आणि गोविंद देशमुख यांनी ही कामगिरी बजावली.