शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

रॉकेलचा ट्रक ५0 हजारांत सोडला!

By admin | Updated: September 27, 2016 02:59 IST

आकोट शहर पोलिसांचा प्रताप; रॉकेल माफियाचे ‘रेकॉर्डिंग’ लोकमतच्या हाती.

सचिन राऊतअकोला, दि. २६- इंधन टाकीमध्ये डिझेलऐवजी रॉकेल असलेला एक ट्रक आकोट पोलिसांनी ५0 हजार रुपये घेऊन सोडल्याचे खळबळजनक प्रकरण एका ह्यकॉल रेकॉर्डिंगह्णमुळे उघडकीस आले आहे. सदर 'रेकॉर्डिंग' लोकमतच्या हाती लागले असून, ते जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.ट्रक सोडण्यासाठी पोलिसांना ५0 हजार रुपये दिल्याची माहिती आकोट येथील एका रॉकेल माफियाने एका व्यक्तीला फोनद्वारे दिली. त्या संभाषणाचे 'रेकॉर्डिंग'मध्ये काही पोलीस अधिकारी, गुन्हे शोध पथक व बिट जमादारास हप्ता देत असल्याचे, स्पष्ट होत आहे.आकोट शहरातील जीवन टायर्स नामक दुकानासमोर एम एच ४0 एके ४७५0 क्रमांकाचा ट्रकचे टायर बदलण्याचे काम सुरू होते. नेमके त्याचवेळी आकोट शहर पोलीस स्टेशनमधील काही पोलीस कर्मचार्‍यांनी त्या ट्रकची झडती घेऊन, डिझेल टॅँकमध्ये रॉकेल असल्याच्या संशयावरून ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आणला. दुपारच्या सुमारास ट्रक पोलीस स्टेशनमध्ये लावल्यानंतर दिवसभर हा ट्रक ठाण्यातच उभा ठेवून कोणतीही कारवाई न करता ५0 हजार रुपये घेऊन सोडून दिला. या ट्रकमध्ये टाकण्यासाठी आकोटातील बड्या रॉकेल माफियाकडून रॉकेल घेण्यात आले होते. त्यामुळे अनेकांनी सदर रॉकेल माफियाला ट्रक पकडल्यासंदर्भात विचारणा केली असता, या रॉकेल माफियाने हप्ते दिल्यावरही पोलिसांनी ट्रक पकडल्याचे स्पष्ट केले. दरम्यान सदर माफीयाने एका व्यक्तीला फोनवर या कारवाईबाबत माहिती देताना, पोलीसांनी सदर ट्रक हा तुमचा किंवा तुमच्या मुलाचा नसल्याचे सांगून, बाहेरील असल्याने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारल्याचे सांगितले; मात्र सदर ट्रक सोडण्यासाठी सदर रॉकेल माफियालाच ५0 हजार रुपये द्यावे लागल्याने त्याने पोलिसांच्या या डबल हप्तेखोरीवर प्रचंड संताप व्यक्त केला. हे ह्यऑडिओ रेकॉर्डीगह्ण पोलीसांच्या हप्तेखोरीवर शिक्कामोर्तब करीत आहे. लोकप्रतिनिधी असलेल्या या रॉकेल माफियाने आकोट येथील काही पोलिस अधिकारी गुन्हे शोध पथक आणि बिट जमादार या सर्वांनाच दर महिन्याला 'पेमेंट' देत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला असून, आकोट शहर पोलिसांनी सदर ट्रक पोलीस स्टेशनमध्ये उभा केल्याचे छायाचित्र आणि रॉकेल माफियाने पोलिसांसह अधिकार्‍यांवर हप्तेखोरीचा आरोप केल्याचे 'रेकॉर्डिंग' लोकमतच्या हाती लागले आहे.