शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केदारने उघडले विजयाचे ‘दार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2017 04:44 IST

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याचा सहकारी फलंदाज केदार जाधव याची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने त्याचा सहकारी फलंदाज केदार जाधव याची मुक्तकंठाने प्रशंसा केली. केदारची ही सर्वोत्तम खेळी ही व्यूरचनेनुसार खेळी असल्याचे विराटने सांगितले. केदार जाधवने इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात ७६ चेंडूंतच १२0 धावांची खेळी केली होती. केदारची ही वनडे कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी ठरली. कर्णधार कोहलीनेदेखील या सामन्यात १0५ चेंडूंत १२२ धावांची खेळी केली. या दोघांच्या जबरदस्त खेळीने भारताने ३५१ धावांचे लक्ष्य ७ गडी गमावून पूर्ण केले.कोहली म्हणाला, ‘‘ त्याच्या खेळीसाठी एकच शब्द आहे तो ‘अतुलनीय’. केदारने फिरकी गोलंदाजांवर दबाव वाढवला होता. मी जितक्या खेळ्या पाहिल्या त्यात ही सर्वोत्तम व्यूहरचनात्मक सर्वोत्तम खेळीपैकी एक आहे. त्याने काही खेळलेले नैसर्गिक फटके अविश्वसनीय होते.’’ कोहली आणि केदारने पाचव्या गड्यासाठी २00 धावांची भागीदारी करताना भारताच्या विजयाचा भक्कम पाया रचला.भारतीय कर्णधार म्हणाला, ‘‘तो असा खेळाडू आहे की जो कोणत्याही परिस्थितीत चांगली कामगिरी करू इच्छितो. अशा खेळपट्टीवर कशी फलंदाजी करायची त्याला माहीत आहे. त्यामुळे दुसऱ्या डावातही फलंदाजी करणे सोपे झाले होते. त्याने सर्वच ‘क्लीन शॉट’ मारले. सहाव्या क्रमांकावर अशीच फलंदाजी करणे आवश्यक असते. त्याला दुसऱ्या एंडकडून मी चांगली साथ देऊ शकलो याचा मला आनंद वाटतो.’’ याआधीच्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून न देऊ शकल्याने केदार नाराज होता, असे विराटने सांगितले. विराट म्हणाला, ‘‘मी त्याला त्याविषयी विचार करण्याची आवश्यकता नाही आणि चांगली कामगिरी सुरू ठेवण्यास सांगितले.’’परिस्थितीवर कसे नियंत्रण ठेवले याविषयी छेडले असता कोहली म्हणाला, आम्ही चर्चा करुन प्रतिहल्ला करणे हाच सर्वात चांगला उपाय असल्याचा निर्णय घेतला. कोणताही फलंदाज चांगल्या चेंडूवर बाद झाला नाही. दुसऱ्या डावातही खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक होती. आम्ही त्यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी षटकार ठोकू शकत होतो. मी ज्या भागीदाऱ्या केल्या त्यातील ही सर्वोत्तम भागीदारींपैकी एक आहे.’ (वृत्तसंस्था)>केदार जाधवने संधीच दिली नाही : मॉर्गनकेदार जाधवच्या सुरेख खेळीने आमच्या योजनेवर पाणी फेरल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने व्यक्त केली. मॉर्गन म्हणाला, ‘‘आम्ही चार विकेट घेतल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही सुमार गोलंदाजी केली याचे मला दु:ख वाटते. केदार अशी खेळी करील याचा विचारही आम्ही केला नव्हता. त्याने पहिल्या चेंडूपासूनच प्रतिहल्ला करणे सुरू केले आणि आम्हाला कोणतीही संधी मिळू दिली नाही.’’