शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसीकडे फेरीवाल्यांची नोंदच नाही

By admin | Updated: August 24, 2016 03:35 IST

फेरीवाले आणि त्यांच्याकडून वसूल होणारी बाजारफी, याची ताजी आकडेवारीच कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे नसल्याची बाब उघडकीस आली

डोंबिवली : डोंबिवलीत रस्त्यांवर बसणारे फेरीवाले आणि त्यांच्याकडून वसूल होणारी बाजारफी, याची ताजी आकडेवारीच कल्याण-डोंबिवली महापालिकेकडे नसल्याची बाब उघडकीस आली आहे. महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनीच त्याचा पोलखोल करत महापालिकेच्या आॅनलाइन विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला. या विभागाकडे २०११ची आकडेवारी असून, त्यानुसार डोंबिवलीतील विविध रस्त्यांवर केवळ नाममात्रच फेरीवाले बसत असल्याची नोंद आहे.‘लोकमत’ने ‘आॅन दी स्फॉट’द्वारे फेरीवाल्यांचे रस्त्यांवर, स्कायवॉकवर झालेले अतिक्रमण, वाढती दादागिरी, मारहाणीच्या घटना तसेच फेरीवाल्यांकडून होणारी हप्ते वसुली घडकीस आणली होती. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या शनिवारी झालेल्या महासभेतही फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच गाजला होता. यावेळी म्हात्रे यांनी महापालिका प्रशासनाकडून मिळालेली २०११ मधील फेरीवाल्यांची आकडेवारी सादर करत महापौर राजेंद्र देवळेकर, आयुक्त ई. रवींद्रन यांना उत्तर देण्यास भाग पाडले. त्यावर देवळेकर यांनी सारवासारव करत आपल्याकडून ती माहिती मागवून घेतली. पण अजूनही कोणतीच ठोस कार्यवाही केली नाही, असे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. शहरातील फेरीवाले आणि त्या तुलनेत महापालिकेला बाजारफीच्या रूपात मिळणारे उत्पन्न यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे महापालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. त्याची चौकशी व्हावी, पारदर्शी कारभार समोर आणा, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे. २०११ नंतर आता २०१६ पर्यंत त्या आकडेवारीत किती वाढ झाली, उत्पन्नात किती वाढले, हे स्पष्ट होत नसल्याने आकड्यांचाच फार मोठा घोळ असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. महापालिकेचे संबंधित अधिकारी-कर्मचारीच प्रशासनाला अपुरी माहिती देत धुळफेक करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.