शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

धुळीत हरवला ‘कात्रज बायपास’

By admin | Updated: January 20, 2017 00:41 IST

कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त असल्याने त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा बायपास वाहनचालकांना प्रवासासाठी नकोसा झाला

पिसोळी : महापालिका हद्दीलगतच्या गावातून जाणारा कात्रज बायपास सुरुवातीपासूनच कोणत्या ना कोणत्या समस्येने ग्रस्त असल्याने त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून हा बायपास वाहनचालकांना प्रवासासाठी नकोसा झाला आहे. खडीमशीन चौकाच्या बाजूने होत असलेले रस्त्याच्या एकबाजूचे सिमेंट काँक्रिटीकरण अत्यंत संथ गतीने होत आहे. तसेच वाहतुकीसाठी उपलब्ध असलेला उर्वरित एका बाजूचा रस्ता खड्डेमय झाल्याने वाहनचालक व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या कामामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे.जुलै २०१६ मध्ये खडी मशीन चौक ते मंतरवाडीपर्यंतच्या कात्रज बायपासचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात कामाचा मुहूर्त फार उशिरा लागला. काम जलदगतीने सुरुवात होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात झाले उलटेच, काम सुरू होऊन अडीच महिने होऊनही आजपर्यंत केवळ दीड दोन किलोमीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण झाला आहे.तसेच रस्त्याच्या ज्या एका बाजूने वाहतूक होत आहे, त्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत, ज्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे जड वाहतूक करण्याऱ्या वाहनांचा वेग मंदावतो. पडलेल्या खड्ड्यांतून प्रचंड प्रमाणात धूळ उडते, ज्यामुळे बायपासच्या आजूबाजूचे रहिवासी, व्यावसायिक त्रस्त आहेत. बायपास रस्त्याच्या बाजूला असलेल्या दुकानांवर, घरांवर, फलकांवर धुळीचे थर साचले आहेत.तसेच हा रस्ता व त्याची देखभाल ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने रस्ता ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतून जात आहे, त्यांना मूग गिळून गप्प बसावे लागत आहे. मागे एका ग्रामपंचायतच्या वतीने रस्त्याच्या दुरवस्थेला जबाबदार असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारांच्या नावाचे फलकच बायपास रस्त्यावर लावले होते. (वार्ताहर)>बांधकाम विभागाचे दुर्लक्षसिमेंट काँक्रिटीकरण चालू असलेल्या बाजूला आता उशिरा साइड रोड बनविण्याचे काम चालू केले आहे, ज्यामुळे सिमेंट काँक्रिटीकरण झालेला भागही वाहतुकीस खुला करता येणार नाही. तसेच सिमेंट काँक्रिटीकरण न केलेल्या भागावर खड्डे बुजविण्याचे कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत. या सर्वाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे ढिसाळ नियोजन कारणीभूत आहे.