शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरबाबत सुवर्णमध्य साधावा लागेल - चाकूरकर

By admin | Updated: August 5, 2016 05:01 IST

शेजारील राष्ट्राला आपण काश्मीरमध्ये काहीही करु शकतो, असे वाटले तर ते धोकादायक ठरु शकते.

मुंबई : शेजारील राष्ट्राला आपण काश्मीरमध्ये काहीही करु शकतो, असे वाटले तर ते धोकादायक ठरु शकते. आजची परिस्थिती अशाच वळणावर आहे. शेजारील देशासोबत युद्ध झाले तर परिस्थिती चिघळेल. त्यामुळे युद्ध होणार नाही, याची काळजी घ्यायची पण त्याचवेळी देशाच्या संरक्षण सिद्धतेची काळजी घ्यायची असा सुवर्णमध्य साधावा लागेल, असे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी सांगितले.‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार सोहळ्यात शिवराज पाटील चाकूरकर यांची मुलाखत ‘लोकमत’चे राजकीय संपादक सुरेश भटेवरा यांनी घेतली. काश्मीरमध्ये सध्या १९९० पूर्वीची परिस्थिती निर्माण झाल्याकडे लक्ष वेधले असता चाकूरकर म्हणाले, मी गृहमंत्री असताना काश्मीर, नागालँड, छत्तीसगड अशा अशांत प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्याकरिता प्रयत्न केले होते. काश्मीर प्रश्नात शेजारील राष्ट्राचा हस्तक्षेप सुरू असल्याने तेथील तणाव वाढतो. काश्मीरमधील बहुतांश लोक भारतात राहण्याच्या विचारांचे आहेत. अर्थात गेल्या काही दिवसांत काश्मीर प्रश्न चिघळल्यापासून केंद्रातील भाजपा सरकारने उचललेली पावले पाहिली तर त्यांनी वेगळे असे काहीच केलेले नसून काँग्रेस पक्षाच्या धोरणांचेच अनुकरण केले आहे. तात्पर्य हेच की, काश्मीरबाबत सत्ताधारी व विरोधक हे एकाच विचारांचे आहेत.लोकसभा व राज्यसभेतील गोंधळाला काही पर्याय नाही का? आम्ही जेव्हा विधानसभा, विधान परिषद किंवा लोकसभा, राज्यसभेत काम करीत होतो तेव्हा जास्त दिवस काम करीत असू. महाराष्ट्रात १०० दिवसांहून जास्त काळ काम व्हायचे. पंडित नेहरु पंतप्रधान असताना संसद १८० दिवस काम करायची. अलीकडे लोकसभा ८० दिवसांपेक्षा जास्त काळ काम करीत नाही. काही राज्यांमधील कामकाज १० दिवस चालते. सर्वोच्च न्यायालय व संसद यांच्यातील संघर्षाचे काही प्रसंग अलीकडे पुन्हा पाहायला मिळाले. आपल्याला त्याबद्दल काय वाटते, यावर पाटील म्हणाले, कुठल्याही भारतीयाने न्यायालयाचा निर्णय योग्य की अयोग्य या भानगडीत पडू नये. एका न्यायमूर्तींनी दिलेल्या निकालाची समीक्षा त्यापेक्षा वरचे न्यायालयच करु शकते. (विशेष प्रतिनिधी)>कुठल्याही भारतीयाने न्यायालयाचा निर्णय योग्य की अयोग्य या भानगडीत पडू नये. एका न्यायमूर्तींनी दिलेल्या निकालाची समीक्षा त्यापेक्षा वरचे न्यायालयच करू शकते. त्यामुळे उत्तराखंड व अरुणाचल प्रदेशाबाबत न्यायालयाने दिलेले निकाल चूक की बरोबर यावर मी भाष्य करणार नाही. मात्र यासंदर्भात जे वाचायला, पाहायला व ऐकायला मिळाले त्यामध्ये न्यायालयाचा निकाल योग्य असल्याचे मतप्रदर्शन करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती.