शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
2
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
4
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
5
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
6
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
7
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
8
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
9
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
10
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
11
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
12
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
13
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
14
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
15
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
16
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."
17
नारनौलमध्ये थरकाप उडवणारा अपघात, तरुणाचा मृतदेह तब्बल ११ किमीपर्यंत फरफटत गेला; दृष्य पाहून स्थानिकही सुन्न
18
Healthy Tea: चहा सोडायचाय? 'हा' घ्या उत्तम पर्याय; एकदा पावडर तयार करा, तीन महीने वापरा!
19
३ महिन्यांत ५० किलो वजन घटवा आणि थेट पोर्शे कार घेऊन घरी जा! जिमनं दिलं 'गोल्डन' चॅलेंज
20
कौतुकास्पद! आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलाने 290 शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे कर्ज फेडले

कास पठार फुलले विविध रंगांच्या फुलांनी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2016 20:32 IST

सातारा शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर विविधरंगी फुले फुलली

आॅनलाईन लोकमतपेट्री, दि. 4 - सातारा शहराच्या पश्चिमेस आंतरराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावर विविधरंगी फुले फुललेली दिसत असून, आतापर्यंत जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो पर्यटकांनी येथे भेट दिली आहे. रविवारीही पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. कास पठारावर एकूण १३२ पैकी सुमारे ७० प्रकारांच्या वनस्पती बहरल्या आहेत. साधारणपणे चाळीस टक्के फुलांचा बहर आलेला आहे.दरम्यान, गेंद, तेरडा, सीतेची आसवे ही फुले बहुतांशी ठिकाणी चांगल्या प्रकारे फुललेली आहेत. वेगवेगळ्या प्रकारची फुले बहुतांशी ठिकाणी आली असून, अद्यापही विविधरंगी फुलांचे गालिचे पाहण्यास 10 ते 15 दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. यासाठी सध्या पठारावर असलेले वातावरण कायम राहणे आवश्यक आहे.कास पठारावर अबोलिमा, कापरू, नीलिमा, गेंद, भारंगी, सोनकी, चवर, दीपकांडी, टूथ ब्रश या वनस्पतींची फुले बहुतांशी ठिकाणी दिसून येत आहेत. तसेच कास पठारावरील राजमार्गावर असणाऱ्या कुमुदिनी तलाव परिसरात गेंद चांगला बहरलेला आहे. कुठे कुठे सीतेची आसवे, तेरड्याला देखील चांगला बहर येऊ लागला आहे. तसेच आठ वर्षांतून फुलणाऱ्या टोपली कारवीला काही ठिकाणी अत्यल्प प्रमाणात फुले आली असून, असेच पोषक वातावरण कायम राहिल्यास येत्या दोन-तीन आठवड्यांत चांगला बहर येण्याची शक्यता आहे. अभ्यासकांना सवलत : अंजनकरपठारावर सध्या चाळीस टक्के फुले फुलली असून, पंधरा सप्टेंबरपर्यंत असेच पोषक वातावरण राहिल्यास विविधरंगी फुलांचे गालिचे पाहण्यास मिळतील. तसेच मुख्याध्यापकांचा दाखला असल्यास शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षकांसाठी 20 रुपये शुल्क असेल. फुलांचा अभ्यास करण्यासाठी वेळेचे बंधन राहणार नाही. फुले पायदळी तुडविले जाणार नाहीत, याची सर्वांनी काळजी घेऊन नियमांचे पालन करावे. दर चार-पाच दिवसांला संबंधित ठिकाणाहून विविध अँगलद्वारे फोटो काढले जाणार आहेत. त्याद्वारे फुलांची काय स्थिती आहे, हे पाहिले जाणार आहे,ह्ण अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

गेंद गवतवर्गीय वनस्पती...गेंद ही गवतवर्गीय वनस्पती आहे. सप्टेंबर महिन्यात पठारी भागावर ही वनस्पती उगवते. उगवलेले गवत गेंद आहे, हे जेव्हा समजते तेव्हा त्याच्यावर पांढरा फेटा बांधल्याप्रमाणे तुरा येतो. तसेच ते इतर गवतातून वर येते. या गवताच्या दांड्यावर टोपीसारखा भाग येतो. म्हणून याला ह्यधनगर गवतह्ण असेही म्हणतात. पांढरा रंग फुलून भरपूर प्रमाणात दिसतो म्हणून गेंद म्हणतात.सीतेची आसवे...कास पठारावर तुरळक ठिकाणी सीतेची आसवे आली असून, गेंद सोबत या फुलांना पाहणे ही पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणी आहे. सह्याद्री पठारावरच्या गवतामध्ये दडून बसलेली ही वनस्पती गवताबरोबर वाढते. अचानक फुले दिसून येतात, निळसर रंगाचे फूल त्यावर पांढऱ्या रंगांचा ठिपका असतो. ही वनस्पती फुलाच्या सुवासाने कीटकांना आकर्षित करते.