शहरं
Join us  
Trending Stories
1
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
2
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
3
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
5
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
6
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
7
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
8
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
9
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
10
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
11
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
12
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
13
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
14
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
15
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
16
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
17
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
18
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
19
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
20
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)

करण जोहर मिसेस फवाद खान, गायक अभिजितने डिवचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2016 13:19 IST

अभिजित भट्टाचार्यने ट्विटरवर करण जोहरचा उल्लेख फवादची बायको असा करत, त्या दोघांचे संबंध देखील जोडले आहेत.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.3- आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि ट्विट्समुळे गायक अभिजित भट्टाचार्य नेहमी चर्चेत असतो. यावेळी त्याने दुसरे-तिसरे कुणाला नाही तर थेट दिग्दर्शक-निर्माता करण जोहरला टार्गेट केले आहे. करण जोहरचा आगामी सिनेमा 'ए दिल है मुश्किल'मध्ये पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्याने सिनेमा वादात अडकला आहे. यामुळे या सिनेमावर चौफेर टीका होत आहे. हाच धागा पकडत अभिजित भट्टाचार्यने ट्विटरवर करण जोहरचा उल्लेख 'फवादची बायको' असा करत, त्या दोघांचे संबंध देखील जोडले आहेत.   
 
''आणखी एक लव्ह जिहाद... मेहबूबा करण जोहर नैराश्यात... पाकिस्तानी लव्हर फवादने धोका दिला, बिच्चारी मिसेस करण जोहर-खान..'' अशा आशयाचे ट्विट करत अभिजितने करणला डिवचले आहे. काही दिवसांपूर्वी करणने त्याचा प्रसिद्ध चॅट शो 'कॉफी विथ करण'च्या येणा-या सिझनसंदर्भात ट्विट केले होते. या चॅट शोमधील पहिला गेस्ट फवाद खान नसणार आहे, असं देखील त्याने स्पष्ट केले होते. यावर कमेंट करताना अभिजितने ही बोचरी टीका केली आहे. अभिजितच्या या ट्विटला करण जोहर कशा पद्धतीने उत्तर देणार, हे आता पाहावे लागणार आहे.
 
दरम्यान,  उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेल्याने पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. शिवाय मनसेसहीत शिवसेनेनेही पाकिस्तानी कलाकार असलेल्या 'ए दिल है मुश्किल' आणि 'रईस'सारख्या सिनेमांना विरोध केला आहे. त्यामुळे आता हे सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार की नाही, असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.