मडगाव : जैका लाच प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर होऊन २४ तास होण्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री व मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या मालभाट येथील निवासस्थानावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) व क्राईम ब्रँचने संयुक्तपणे छापा टाकला.याच प्रकरणातील हवालाशी संबंधित तपासासाठी सकाळी सहाच्या सुमारास हा छापा टाकण्यात आला. सुमारे दोन तास ही कार्यवाही सुरू होती. ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांसमवेत गोवा क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभूदेसाई हेही उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कामत यांच्या निवासस्थानी ‘ईडी’चा छापा
By admin | Updated: August 21, 2015 00:40 IST