शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कामती जि़प़ गटात दुरंगी लढत

By admin | Updated: February 18, 2017 15:07 IST

कामती जि़प़ गटात दुरंगी लढत

कामती जि़प़ गटात दुरंगी लढतअशोक कांबळे - आॅनलाईन लोकमत मोहोळ२००२ मध्ये शिवसेनेच्या ताब्यात गेलेल्यांचा अपवाद वगळता आजतागायत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणारा कामती जि़ प़ गट ओबीसी जनरलसाठी राखीव झाला आहे़ धनगर समाजाचे प्राबल्य असणाऱ्या या गटात भीमा परिवार विकास आघाडीचे नेते राष्ट्रवादीचे माजी जिल्हा अध्यक्ष मनोहर डोंगरे यांचे खंदे समर्थक लांबोटीचे विद्यमान सरपंच तानाजी खताळ उभे आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांचे समर्थक जिल्हा दूध संघाचे माजी संचालक सज्जनराव पाटील हे उभे आहेत़ राष्ट्रवादीच्याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्याच दोन नेत्यांच्या गटात फूट पडून राष्ट्रवादीच्या एका गटाला शह देण्यासाठी भीमा परिसर विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीने खासदार धनंजय महाडिक, मनोहर डोंगरे व सेना व इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीतून उभे असलेले तानाजी खताळ व राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून सज्जनराव पाटील अशी दुरंगी लढत या गटात लागली आहे़धनगर समाजाचे प्राबल्य असणाऱ्या या जि़प़ गटात दोन्ही उमेदवार धनगर समाजाचे आहेत़ त्यामुळे आता या जि़प़ गटात राजन पाटील यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर राष्ट्रवादी पुन्हा गट ताब्यात ठेवण्यात यशस्वी होणार का, राष्ट्रवादीच्याच एका गटाच्या ताकदीबरोबर धनंजय महाडिक व शिवसेनेचा पाठिंबा असणाऱ्या महाआघाडीच्या जोरावर राष्ट्रवादीकडून गड हिसकावून घेण्यात महाआघाडी यशस्वी होणार का, अशा या थेट दुरंगी लढतीकडे तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़ ऐन निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादीत फूट पडली़ राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांनी भीमा परिवार विकास आघाडीसोबत जाऊन तालुक्यात राजन पाटील यांच्या राष्ट्रवादीला आव्हान दिले आहे़ या फुटीतच तानाजी खताळ यांनी मनोहर डोंगरे यांचे नेतृत्व स्वीकारत आघाडीतून उमेदवारी दाखल केली आहे़तर दुसरीकडे राष्ट्रवादीची एकहाती धुरा सांभाळत राजन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सर्व आघाड्यांना आव्हान देण्यासाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहे़त. अशा राष्ट्रवादीतून दूध संघाचे माजी संचालक सज्जनराव पाटील यांनीही उमेदवारी घेऊन आव्हान स्वीकारले आहे़------------------------राष्ट्रवादीचा बालेकिल्लाकामती जि़ प़ गट हा पूर्वीपासून काँग्रेस व राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो़ २००२ मध्ये मात्र या गटावर शिवसेनेने विजय मिळविला होता़ नंतर पुन्हा राष्ट्रवादीने हा गड ताब्यात ठेवण्यात यश मिळविले होते़ परंतु आता राष्ट्रवादीचेच दोन प्रबळ गट एकमेकांविरोधात गेल्याने एका बाजूला निष्ठावंत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तर दुसरीकडे राष्ट्रवादी भीमा परिवार विकास आघाडी, सेना, भाजपा, रासप व इतर मित्रपक्ष या गटात आघाडीसोबत आहेत़ त्यामुळे या गटात लागलेल्या या दुरंगी सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे़