शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपट महामंडळात सामंजस्याचे वारे !

By admin | Updated: May 21, 2016 02:09 IST

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अलीकडेच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महामंडळात सत्तांतर झाले

राज चिंचणकर,

मुंबई- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अलीकडेच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर महामंडळात सत्तांतर झाले आणि या पार्श्वभूमीवर महामंडळाच्या नवनिर्वाचित संचालकांची मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीनंतर महामंडळात सामंजस्याचे वारे वाहू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. महामंडळाच्या संचालकांनी या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी वार्तालाप करतेवेळी ही बाब स्पष्ट झाली.कोल्हापूर येथे या निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याच्या काळात कथित मारहाणीच्या काही घटना घडल्याचे, महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष विजय पाटकर यांनी निवडणुकीच्या निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते. आता स्वत: विजय पाटकर या विद्यमान संचालकांच्या मांदियाळीत असताना त्यांची याविषयीची एकूणच भूमिका काय असेल, याबाबत औत्सुक्य होते. या पार्श्वभूमीवर, आता आमचा समेट झाला आहे. महामंडळाच्या भल्यासाठी एकत्रितपणे काम करणार असल्याचे विजय पाटकर यांनी स्पष्ट केले आहे. तर, महामंडळाच्या हिताच्या दृष्टीने आम्ही एकदिलाने कार्यरत राहू, अशी भूमिका महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मांडली आहे. दरम्यान, महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी घडलेल्या काही अनुचित प्रकाराबाबत अध्यक्ष या नात्याने खेद व्यक्त करणारे पत्र मेघराज राजेभोसले यांनी महामंडळाच्या बैठकीत सादर केल्याचे वृत्त आहे. महामंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून मेघराज राजेभोसले यांची निवड झाल्यानंतर मुंबईत सर्व संचालकांच्या उपस्थितीत प्रथमच ही बैठक झाली. महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांच्या पॅनलने १४ पैकी १२ जागा जिंकत बाजी मारली होती; तर विजय पाटकर यांच्या पॅनलचे त्यांच्यासह मिळून एकूण दोन उमेदवार विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निकालाच्या काळात गढूळलेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सध्या महामंडळात सामंजस्य निर्माण झाल्याचे एकूणच चित्र आहे.