शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

संमेलन यजमानपदासाठी कल्याण, डोंबिवलीचा हट्ट

By admin | Updated: September 18, 2016 02:09 IST

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांंच्या अध्यक्षतेखालील समितीने शुक्रवारी साहित्य संमेलनासाठी डोंबिवली आणि कल्याण या स्थळांची पाहणी केली.

डोंबिवली/कल्याण : एखाद्या शहरात संमेलन झाले म्हणजे ते वाङ्मयदृष्ट्या सकस झाले असे नव्हे, असा टोला लगावत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांंच्या अध्यक्षतेखालील समितीने शुक्रवारी साहित्य संमेलनासाठी डोंबिवली आणि कल्याण या स्थळांची पाहणी केली. एकाच मनपातील या दोन्ही संस्थांनी स्वतंत्र संमेलनासाठी हट्ट धरल्याने या पाहणीनंतर अखेर समितीला सीमाप्रश्नामुळे गाजणारे बेळगाव गाठावे लागले. राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीच्या काळात होणाऱ्या या संमेलनाच्या स्थळाचा फैसला येत्या रविवारी होणार आहे. ते भाजपाच्या प्रभावाखालील क्षेत्रात असेल की शिवसेनेच्या, याचे गुपितही त्याच दिवशी उलगडेल.डोंबिवलीतील आगरी युथ फोरम आणि कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाने अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निमंत्रण दिले होते. ही दोन्ही शहरे एका महापालिकेच्या हद्दीत असल्याने दोन्ही प्रस्ताव एकत्र करून संयुक्तपणे आयोजन करावे, असे मत मांडून काहींनी त्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. मात्र, त्याला फारसे महत्त्व न देता दोन्ही आयोजक संस्थांनी आपलाच हट्ट कायम ठेवल्याने साहित्य महामंडळाच्या समितीने दोन्ही शहरांतील जमेच्या आाणि उणिवेच्या बाजू समजून घेतल्या. आयोजकांचेच एकमत नसल्याने पाहणीनंतर अखेर त्यांनी बेळगावच्या दिशेने मोर्चा वळवला. वस्तुत: संमेलनासाठी निमंत्रण दिलेल्या संस्थांत फारशी मोठी शहरे नसल्याने डोंबिवली-कल्याण या शहरांचे पारडे जड होते; परंतु आपल्याच हट्टावर आयोजक ठाम राहिल्याने समितीला बेळगावचीही पाहणी करावी लागली. (प्रतिनिधी)महापौरांची डोंबिवलीला दांडी वस्तुत: महापौर हे पालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शहरांचे प्रथम नागरिक असतात. पण, मूळचे कल्याणकर असलेल्या राजेंद्र देवळेकर यांनी संमेलनस्थळांच्या पाहणीवेळी डोंबिवलीतील बैठकीला दांडी मारून कल्याणच्या बैठकीला हजेरी लावली. पालिकेच्या अर्थसंकल्पातील तरतूद ही एकाच शहरासाठी असल्याप्रमाणे त्यांनी समितीसमोर सादरीकरण केले. त्यांनी फक्त कल्याण शहराची बाजू उचलून धरल्याने डोंबिवलीच्या साहित्यप्रेमींत नाराजी पसरली.