शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कलाम अन् त्यांची ती अविस्मरणीय भेट

By admin | Updated: July 29, 2015 22:03 IST

स्नेहल गांधी : विमानाच्या प्रवासातील तो क्षण..

शोभना कांबळे - रत्नागिरी मुंबईहून दिल्लीला जात असलेल्या भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्यासोबत काही दुर्मीळ क्षण व्यतीत करता आले, एका असामान्य व्यक्तिमत्त्वाला जवळून पाहता आलं, हा आपल्या आयुष्यातील अतिशय भाग्याचा क्षण असल्याची प्रतिक्रिया दापोलीची कन्या स्नेहल गांधी हिने लोकमतकडे व्यक्त केली.दापोलीचे रमण गांधी यांची स्नेहल ही कन्या. रमण गांधी मर्चंट नेव्हीमधून काही वर्षापूर्वीच सेवानिवृत्त झाले. स्नेहल एक वर्षापासून मुंबईच्या एअरलाईन्स कंपनीच्या विशेष विभागात कार्यरत आहे. या विभागाला नामवंत व्यक्तिंबाबत दक्ष राहावे लागते. या कंपनीच्या विमानाने पाच महिन्यांपूर्वी डॉ. अब्दुल कलाम दिल्लीला चालले होते. त्यावेळी स्नेहल आणि तिच्या इतर सहकाऱ्यांना या थोर व्यक्तिला जवळून पाहता आले. त्यामुळे ही आठवण ताजी असतानाच डॉ. कलाम यांच्या अचानक झालेल्या निधनाची वार्ता कळताच स्नेहलला धक्काच बसला.कलाम यांच्या या भेटीची आठवण ताजी करताना स्नेहल म्हणाली, डॉ. कलाम हे आमच्या विमानसेवेने दिल्लीला जाणार असल्याचे कळताच खूप आनंद झाला. एवढ्या थोर शास्त्रज्ञाला जवळून पाहाण्याची तीव्र इच्छा होतीच. अनायासे आता ती पूर्ण होणार होती. त्या दिवशी प्रत्यक्ष ते आल्यानंतर मी माझ्या सरांकडे त्यांच्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. अखेर डॉ. कलाम यांच्या स्वीय सहायकांकडून ही परवानगी मिळाली. तोपर्यंत ती मिळेल की नाही, ही मनात धाकधूक असल्याचे स्नेहलने सांगितले. प्रत्यक्ष फोटो घेताना मी त्यांना अतिशय जवळून पाहात होते. त्यांचे हास्य अतिशय निष्पाप, निर्मळ असे होते. त्यांच्यामध्ये कुठलाच ‘अ‍ॅटिट्यूड’ दिसत नव्हता. त्यांच्या निधनाची वार्ता जेव्हा माझ्या मम्मीने सांगितली, तेव्हा मी ड्युटीवर होते. पण ऐकताच खूप विषण्णता वाटली. देश एका अमोल रत्नाला, शास्त्रज्ञाला मुकला आहे, अशा शब्दात स्नेहलने आपल्या भावना व्यक्त केल्या. (प्रतिनिधी)