शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

कदीर मौलाना यांचा राष्ट्रवादीचा राजीनामा

By admin | Updated: October 6, 2014 12:08 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडा, असे यापुढे आपले धोरण असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

औरंगाबाद : पक्षाचे नेतृत्व अल्पसंख्याक समाजाची फसवणूक करणारे आहे, अशी तोफ डागत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि औरंगाबाद मध्य मतदारसंघातून तिकीट नाकारलेले अब्दुल कदीर मौलाना यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे रविवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पाडा, असे यापुढे आपले धोरण असल्याचे सांगत त्यांनी काँग्रेसला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतर घेणार असलो तरी सध्या काँग्रेससारख्या धर्मनिरपेक्ष पक्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे ते म्हणाले. औरंगाबाद मध्य मतदारसंघात २००९च्या निवडणुकीत आपल्याला पक्षाने तिकीट दिले आणि काही लोकांनी विरोधात काम करून पाडले. तरीही मुस्लीम समाजाच्या मतदानावर दुसऱ्या क्रमांकावर येत मी पक्षाची लाज राखली. त्यानंतरही मी पाच वर्षे मतदारसंघात दलित, मुस्लीम आणि हिंदू मतांची उत्तम सांगड घालत काम केले. मी मतदारसंघात पक्षाचे वर्चस्व कायम ठेवले. मुस्लीम समाजाला विश्वास होता की, पक्ष मला किंवा दुसऱ्या मुस्लीम कार्यकर्त्याला उमेदवारी देईल. राष्ट्रवादी काँग्रेसची आतून जातीयवादी पक्षांशी युती असून, मुस्लीम समाजाने यापुढे काँग्रेसला समर्थन दिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावरही त्यांनी टीका केली. ते हुकूमशहा असून, पक्षाचे कार्यकर्ते म्हणजे गुलाम समजतात. दलित, मुस्लीम, अल्पसंख्याक समाजाला या पक्षात न्याय देत नाहीत. दलित समाजासाठीची ७ कोटी रुपयांची उद्योग योजनाही अजित पवार यांनी रोखून धरली, असे ते म्हणाले. या पक्षात मराठेतरांना पद्धतशीरपणे बाजूला केले जाते. हा पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्याचा आरोपही त्यांनी केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरजितसिंग खुंगर, पक्षाचे शहर उपाध्यक्ष हाजी इसा कुरेशी आणि नवाब पटेल यांनीही पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जाहीर करण्यात आले. (प्रतिनिधी)