शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

न्या. टहलियानी आज निवृत्त होणार

By admin | Updated: August 21, 2015 01:05 IST

अजमल कसाब याला फाशीची शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी तब्बल २८ वर्षे न्यायदानाची सेवा बजावून शुक्रवारी निवृत्त होत आहेत

मुंबई: अजमल कसाब याला फाशीची शिक्षा ठोठावणारे न्यायाधीश मदनलाल लक्ष्मणदास टहलियानी तब्बल २८ वर्षे न्यायदानाची सेवा बजावून शुक्रवारी निवृत्त होत आहेत. दंडाधिकारी ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असा पल्ला गाठणारे न्या. टहलियानी स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत.अ‍ॅडव्होकेट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडियाने गुरुवारी न्या. टहलियानी यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. या समारंभात अनेक ज्येष्ठ वकील, विधिज्ञ उपस्थित होते. सुनावणीत वकिलांचा युक्तिवाद ऐकण्यासोबतच ते थेट आशिलालाच प्रश्न विचारून तथ्यता पडताळून घेत, असे अ‍ॅड. एस.आर. चिटणीस यांनी सांगितले. १९८७मध्ये दंडाधिकारी म्हणून न्यायदानाची सेवा सुरू करणाऱ्या न्या. टहलियानी यांनी सत्र न्यायालयाच्या कारकिर्दीत २६/११चा हल्ला, गुलशन कुमार हत्याकांड, दत्ता सामंत मर्डर केस असे बहुचर्चित व गुंतागुंतीचे खटले हाताळले. त्यांनी अतिरिक्त सत्र न्यायाधीश, सत्र न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश म्हणूनही जबाबदारी पार पाडली. उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार म्हणूनही त्यांनी काम पाहिले. विशेष न्यायाधीश म्हणून सीबीआयने दाखल केलेले खटलेही त्यांनी हाताळले. २०१०मध्ये त्यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. कसाबसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालपत्रात न्या. टहलियानी यांची स्तुती केली होती. (प्रतिनिधी)