शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या चार तासांत इंदापूर झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2017 03:29 IST

संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचे अकलूजकडे प्रस्थान झाल्यानंतर अवघ्या चार तासांत इंदापूर शहराची साफसफाई झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कइंदापूर : संतश्रेष्ठ तुकाराममहाराजांच्या पालखीचे अकलूजकडे प्रस्थान झाल्यानंतर अवघ्या चार तासांत इंदापूर शहराची साफसफाई झाली. बाळा ढवळे मित्र परिवार, श्रीनाथ मित्रमंडळ, शिवज्योत तरुण मित्रमंडळ, कै. अजित ढवळे फाउंडेशन व सरस्वतीनगर येथील नागरिकांनी ही किमया केली.सकाळी ६ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळा ढवळे यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली राहुल जावीर, हमीद शिकलगर, जावेद सय्यद चाचा, पप्पू सय्यद, अल्ताफ काझी, संजय चव्हाण, अ‍ॅड. आशुतोष भोसले, पंकज नरुटे, निसार शेख, रवी क्षीरसागर, अजिंक्य जावीर व इतर कार्यकर्त्यांनी सरस्वतीनगरपासून स्वच्छता मोहिमेची सुरुवात केली. रिंगण सोहळ्याचे पटांगण, कसबा पेठ, नेहरू चौक, शहराचा मुख्य रस्ता, खडकपुरा, श्री नारायणदास रामदास हायस्कूलचे प्रांगण, पंचायत समिती, काँग्रेस भवनपर्यंतच्या परिसरातील सफाई त्यांनी केली.या कार्याबद्दल कर्मधर्म संयोगाने मारुती मंदिराजवळ असणाऱ्या पालखी विश्वस्तांनी या सर्वांचा सत्कार केला. सरस्वतीनगर भागात असणाऱ्या बाळा ढवळे मित्र परिवार, श्रीनाथ मित्र मंडळ, शिवज्योत तरुण मित्र मंडळ, कै. अजित ढवळे फाउंडेशन यांच्या माध्यमातून तरुणांचा मोठा संच सामाजिक कार्यक्रमात सक्रिय असतो. लोकांच्या वैयक्तिक व सामूहिक अडचणीच्या वेळी तो धावून जातो ही नित्याची बाब आहे. याही वेळी बाळा ढवळे यांच्या हाकेसरशी धावून येऊन या तरुणांनी स्वच्छता मोहीम चुटकीसरशी फत्ते केली. तरुणांमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी होती. त्यांनी हिरिरीने हातभार लावून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला.